शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
4
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
5
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
6
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
7
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
8
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
9
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
10
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
11
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
12
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
13
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
14
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
15
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
16
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
17
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
18
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
19
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
20
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव

अब्जाधीश व्यक्तीच्या हत्येचा खळबळजनक खुलासा, गर्लफ्रेन्डच्या मुलानेच केली होती हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 17:46 IST

UK Crime News : सटन यांचा मृतदेह त्यांच्या २० कोटी रूपयांपेक्षा महागड्या बंगल्यात सापडला होता. त्यांची कुणीतरी चाकूने वार करत हत्या केली होती.

ब्रिटनमधील (UK) सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक सर रिचर्ड सटनच्या (sir Richard Sutton) हत्येप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. रिचर्ड सटनची हत्या करणारा दुसरा-तिसरा कुणी नसून त्याच्या गर्लफ्रेन्डचा मुलगाच आहे. या मुलानेच हॉटेल टायकून सटनच्या (Sir Richard Sutton Murder Case) हत्येप्रकरणात आपला गुन्हा कबूल केला आहे. 

'द सन यूके'च्या वृत्तानुसार, यावर्षी ७ एप्रिलला ८४ वर्षीय सर रिचर्ड सटन यांची हत्या करण्यात आली होती. सटन यांचा मृतदेह त्यांच्या २० कोटी रूपयांपेक्षा महागड्या बंगल्यात सापडला होता. त्यांची कुणीतरी चाकूने वार करत हत्या केली होती. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये हे सिद्ध झालं होतं की, सटनच्या छातीवर धारदार शस्त्राने अनेक वार करण्यात आले होते.

याप्रकरणी रिचर्ड सटनच्या प्रेयसीच्या ३४ वर्षीय मुलगा थॉमस श्रायबरला ताब्यात घेतलं. सुरूवातीला थॉमसने त्याचा या हत्या प्रकरणात काहीच हात नसल्याचं सांगितलं होतं. त्याच्यावर आपली आई म्हणजे रिचर्ड सटनची प्रेयसीवरही जीवघेणा हल्ला करण्याचा आरोप आहे. 

चौकशीतून समोर आलं की, तो हत्येच्या दिवशी घटनास्थळी उपस्थित होता. पुराव्यांचा आधारावर जेव्हा त्याला हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं तेव्हा तो त्याचा गुन्हा मान्य केला. त्याने हेही सांगितलं की, त्याच्याकडून चुकून हे कृत्य झालं. त्याने हे ठरवून केलं नाही.

दरम्यान, सर रिचर्ड सटन ब्रिटनच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक होते. त्यांचे हॉटेल्स देशभरात होते. त्यांच्याकडे खूप  प्रॉपर्टी आणि फार्म हाऊस होते. त्यांच्याकडे कोट्यावधी रूपयांची संपत्ती होती. त्यामुळे हा वाद झाल्याचं बोलंलं जात आहे. कारण रिचर्ड सटनला पत्नीकडून दोन मुले होते. २०२० मध्ये त्यांची एकूण संपत्ती ३० अब्ज रूपयांपेक्षा अधिक होती. 

टॅग्स :LondonलंडनInternationalआंतरराष्ट्रीयCrime Newsगुन्हेगारी