शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी चोरणाऱ्या सराईत आरोपीला अटक, ५ गुन्ह्यांची उकल, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 20:55 IST

दुचाकी चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे. आरोपीकडून ५ गुन्ह्यांची ...

दुचाकी चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे. आरोपीकडून ५ गुन्ह्यांची उकल करून १ लाख ७२ हजार रुपये किंमतीच्या चोरीच्या ३ दुचाकी आणि इतर दुचाकींचे पार्टही हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी व सपोनि शिवकुमार गायकवाड यांनी शुक्रवारी दिली आहे.

वाकणपाडा येथे राहणाऱ्या अजयकुमार यादव (२६) या तरुणाने ४ मे रोजी आयान मेडीकलच्या समोर पार्किंग केलेली दुचाकी चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी पेल्हार पोलिसांनी वाहन चोरीचा गुन्हा दाखल केला होता. पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार होणाऱ्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी गुन्हे प्रकटीकारण पथकातील अधिकारी व अंमलदार यांना चोरी झालेल्या दुचाकींचा व आरोपींचा छडा लावण्यासाठी योग्य त्या सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी हद्दीत उघड दुचाकी चोरीचे गुन्ह्यांच्या घटनास्थळी भेट दिली. त्याठिकाणी गुन्ह्यांचा कौशल्यपूर्ण तपास करुन दुचाकी चोरणारा वसीम शेख असल्याची खात्रीशीर माहीती प्राप्त केली. त्यानुसार वसिम शेख (३०) याला तो चालवत असलेल्या गॅरेज मधून ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या कौशल्यपुर्ण तपासात त्याने पेल्हारच्या हद्दीत मागील दोन महिन्यात ५ दुचाकी चोरी करून त्यापैकी २ दुचाकी कटिंग केल्या. आरोपीकडून पोलिसांनी ५ गुन्ह्यांची उकल करून १ लाख ७२ हजार रुपये किंमतीच्या ३ दुचाकी व इतर दुचाकीचे पार्ट हस्तगत केले आहे.

सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त जयंत बजबळे, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांचे मार्गदर्शनाखाली पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, पोलीस निरीक्षक दिलीप राख व शकील शेख, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि रमेश वाघचौरे, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, सहा फौजदार योगेश देशमुख, पोलीस हवालदार तानाजी चव्हाण, अनिल शेगर, वाल्मिक पाटील, मिथुन मोहिते, रवि वानखेडे, किरण आव्हाड, दिलदार शेख, अभिजित नेवारे आणि वसीम शेख यांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnalasopara-acनालासोपारा