शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
2
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
3
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
4
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
5
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल चामखीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
8
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
9
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
10
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
11
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
12
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
13
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
14
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
15
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
16
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
17
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
18
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
19
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
20
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

गडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण; दोघांवर मिळून ६ लाखांचे होते बक्षीस

By मनोज ताजने | Updated: September 21, 2022 14:22 IST

विलय दिनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाचे यश

गडचिरोली : नक्षल्यांकडून बुधवार दि.२८ पासून पाळल्या जात असलेल्या विलय दिन सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर दोन नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलापुढे आत्मसमर्पण केले. त्यातील अनिल उर्फ रामसाय जगदेव कुजूर (२६ वर्ष) याच्यावर ४ लाखांचे तर रोशनी उर्फ ईरपे नरंगो पल्लो (३० वर्ष) हिच्यावर २ लाखांचे ईनाम शासनाने ठेवले होते. हे दोघेही सध्या आपापल्या घरी राहून नक्षल चळवळीसाठी काम करत होते.

अनिल हा एटापल्ली तालुक्यातील रा. तिम्मा जवेली येथील रहिवासी असून रोशनी ही छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातील डांडीमरका या गावातील रहिवासी आहे. नक्षल चळवळीपासून दूर जाऊन शांततेने जीवन जगण्यासाठी त्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारला. चळवळीत महिलांना दुय्यम वागणुकीसह अनेक बाबतीत डावलले जाते. वरिष्ठ माओवाद्यांकडून महिलांना लग्नासाठी बळजबरी केली जाते, अशा अनेक कारणांमुळे आपण आत्मसमर्पण करीत असल्याचे त्यांनी सांगितले, अशी माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता या दोघांनाही केंद्र व राज्य शासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.

दलममधील सहभाग आणि गुन्हे    अनिल कुजूर : डिसेंबर २००९ मध्ये कसनसूर दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन मे २०१० पर्यंत तिथे कार्यरत होता. मे २०१० ते २०१२ पर्यंत कसनसूर दलममध्ये कार्यरत होता. त्यानंतर २०१२ ते २०२२ या दरम्यान घरी राहूनच नक्षल दलमने सांगितलेले कामे करत होता. यादरम्यान तो २०११ मधील खोब्रामेंढा ॲम्बुशमध्ये सहभागी होता. त्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद तर ५ जवान जखमी झाले होते. तसेच निहायकल ते ग्यारापत्ती रोडवरील ॲम्बुशमध्ये सीआरपीएफचे ५ जवान जखमी झाले होते. २०११ मधील छोटा झेलिया जंगलातील चकमकीतही तो सहभागी होता.

रोशनी पल्लो : सन २००९ मध्ये छत्तीसगडमधील जटपूर दलममध्ये ती सदस्य पदावर भरती झाली. काही दिवसातच तिला झोन टेक्निकल दलममध्ये पाठविण्यात आले. २०१५ ते २०१८ पर्यंत एसीएम व उपकमांडर पदावरही ती कार्यरत होती. त्यानंतर जुलै २०१८ पासून ती घरी राहून दलमचे काम करत होती. तिचा सन २०१५ मध्ये मौजा कुंदला (छ.ग.) जंगल परिसरातील चकमक, मौजा गुंडूरपारा (छ.ग.) जंगल परिसरातील चकमक आणि २०१७ मध्ये मौजा दुरवडा (छ.ग.) येथील गोटूलमध्ये व जंगल परिसरात झालेल्या दोन चकमकींमध्ये सहभाग होता. २०१५ मध्ये भामरागड तालुक्यातील मौजा इरपनार गावातील ३ लोकांच्या खुनाचा तिच्यावर आरोप आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnaxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली