शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मोरणा-गुरेघरमध्ये गोळीबारात दोघांचा मृत्यू, एकजण जखमी

By जगदीश कोष्टी | Updated: March 20, 2023 00:26 IST

पाटण तालुक्यात खळबळ, वैयक्तिक वादातून झाडल्या गोळ्या

जगदीश कोष्टी, कोयनानगर/पाटण: पाटण तालुक्यातील मोरणा विभागातील गुरेघर धरण परिसरात रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला. या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला. श्रीरंग जाधव (वय ४५), सतीश सावंत (३०) अशी गोळीबारात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर प्रकाश जाधव (४२, तिघे रा. कोरडेवाडी, ता. पाटण ) हे जखमी झाले आहेत. जखमीला कराडला उपचारासाठी हलवण्यात आले आहे.पोलिस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मोरणा विभागातील गुरेघर परिसरात राहणाऱ्या दोघांमध्ये वैयक्तिक कारणातून वाद होता. या वादातूनच चार दिवसांपूर्वी त्यांच्यात वादावादी झाल्याचीही चर्चा आहे. या वादावादीबाबत पोलिस ठाण्यातही तक्रारी करण्यात आल्या होत्या, असे सांगण्यात येते. त्यानंतर रविवारी रात्री गावातील काहीजण जाब विचारण्यासाठी गेले तेव्हा मदन कदम याने गोळीबार केला. यामध्ये श्रीरंग जाधव आणि सतीश सावंत यांचा मृत्यू झाला तर प्रकाश जाधव जखमी झाले. ग्रामस्थांना काही समजण्यापूर्वीच गोळ्या झाडल्याचा आवाज आल्यामुळे ग्रामस्थांची धावपळ उडाली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पाटण पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने रवाना झाले. उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक लावंड यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत पोलिस त्याठिकाणी थांबून होते. गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळीच थांबला होता, असे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी मदन कदम याला ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून पिस्तूल जप्त केली आहे.

टॅग्स :Firingगोळीबार