शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 17:25 IST

मंगेश कराळे नालासोपारा :- घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात माणिकपुर गुन्हे प्रकटीकरण पथकास यश मिळाले आहे. दोन्ही आरोपीकडून ...

मंगेश कराळे

नालासोपारा :- घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात माणिकपुर गुन्हे प्रकटीकरण पथकास यश मिळाले आहे. दोन्ही आरोपीकडून २ लाख ४१ हजार ६८५ रुपये किंमतीचे रोख रक्कम, चांदीचे दागिने हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी सोमवारी दिली आहे.

वसईच्या के टी एम्पायर येथे केटी बिल्डर्सचे कार्यालय आहे. या कार्यालयात २१ नोव्हेंबरला रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास दोन चोरट्यांनी बंद कार्यालयाच्या मागील गेट तोडून कार्यालयात प्रवेश करत रोख रक्कम, चांदीचे दोन शिक्के, पाच चांदीचे पेले असा ४ लाख ५५ हजाराचा मुद्दैमाल चोरून नेला होता. या चोरी प्रकरणी माणिकपूर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. माणिकपुर पोलीस ठाणे हद्दीमध्ये वारंवार घरफोडीसारखे गुन्हे होत असल्याने पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन माणिकपुरच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास आरोपींचा शोध घेण्याबाबत मार्गदर्शक सुचना दिल्या.

त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाने वसई, विरार तसेच अंधेरी, मुंबई परिसरातील जवळपास १५० सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपींचा मागोवा घेतला असता सदरचे आरोपी हे अंधेरी रेल्वे स्टेशन परिसरात फिरस्ते असल्याची माहिती प्राप्त झाली. अंधेरी येथुन सापळा रचुन आरोपी राहुल ऊर्फ अमर सुरेंदर सिंग (३५) आणि करण ओमप्रकाश खैरवाल (२४) यांना शिताफीने अटक करुन त्यांचेकडुन २ लाख ४१ हजार ६८५ रुपये किंमतीचे रोख रक्कम, चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.

सदरची कारवाई पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले/श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बड़े, वरिष्ट पोलीस निरीक्षक राजू माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मिलिंद साबळे, पोलीस निरीक्षक (प्रशासन) ऋषिकेश पवळ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सनिल पाटील, पोलीस हवालदार शैलेश पाटिल, शामेश चंदनशिवे, धनंजय चौधरी, गोविंद लवटे, आनंदा महादेव, प्रषिण कांदे, पुजा कांबळे यांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी