शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

घरफोडी करून अडीच लाखांचे दागिने लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 23:49 IST

घरात कोणीही नाही, हा मोका साधून चोट्यांनी घरफोडी करून ११ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह २५ हजार रुपये रोख, असा एकूण २ लाख ४५ रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला असल्याची घटना कोरेगावमूळ (ता. हवेली) येथे घडली आहे.

लोणी काळभोर -  घरात कोणीही नाही, हा मोका साधून चोट्यांनी घरफोडी करून ११ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह २५ हजार रुपये रोख, असा एकूण २ लाख ४५ रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला असल्याची घटना कोरेगावमूळ (ता. हवेली) येथे घडली आहे.या प्रकरणी पंकज सुभाष येलमागे (वय ३७, रा. प्रयागधाम हॉस्पिटल, बिल्डिंग नंबर ८ रुम क्रमांक २४, ता. हवेली. मुळ रा. देवठाण, ता. अकोले, जि. अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणी काळभोर पोलीसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार पंकज येलमागे यांचे वडील सुभाष व आई मंजूळा हे दोघे कोरेगावमुळ ग्रामपंचायत हद्दीतील बोधेवस्ती येथे असलेल्या आनंदवास्तु अपार्टमेंट मध्ये दुस-या मजल्यावर फ्लॅट क्रमांक २०२ मध्ये रहातात. त्यांची आई ३ फेब्रुवारी रोजी देवदर्शनासाठी चाळीसगांव येथें गेली.घरफोडी झाली असल्याचा संशय आलेने त्यांनी आपल्या आईला सदर घटना कळवली. त्यावेळी आईने त्यांना लाकडी कपाटाचे ड्रॉव्हरमध्ये रोख रक्कम व सोन्याचे दागिने ठेवले आहेत अशी माहिती दिली.चोरट्यांनी बंद घराचे दरवाज्याचा कोयंडा तोडून आत प्रवेश करून बेडरूम मध्ये असलेल्या लाकडी कपाटातली ड्रॉव्हर मध्ये ठेवलेले ४० हजार रुपये किमतीची २ तोळे वजणाची मोहनमाळ, ८० हजार रुपये किमतीचे प्रत्येकी २ तोळे वजणाची २ मोठी मंगळसूत्र, ४० हजार रुपये किमतीची प्रत्येकी १ तोळे वजणाची २ लहान मंगळसूत्र, २० हजार रुपये किमतीचे १ तोळा वजणाचे कानातील २ जोड, ४० हजार रुपये किमतीच्या २ तोळे वजणाच्या ४ बांगड्या असे एकूण ११ तोळे वजणाचे सोन्याचे दागिने व २५ हजार रुपये रोख असा एकूण २ लाख ४५ हजार रुपये किमतीचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला असल्याची फिर्याददिली आहे.घरातील साहित्य व कपडे अस्ताव्यस्त...दुपारनंतर सदर फ्लॅटला कुलूप लावून पंकज हे वडीलांनाआपल्या समवेत घरी घेऊन गेले. ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास पंकज घरी असताना त्यांना आईवडील रहात असलेल्या फ्लॅटमध्ये चोरी झाली असल्याची माहिती फोनवरून कळाली. ते तात्काळ आनंदवास्तु अपार्टमेंटमध्ये पोहोचले व पाहिले असता त्यांना आईवडील रहात असलेल्या फ्लॅटचा दरवाजा उघडा त्याचा कोयंडा तुटलेल्या अवस्थेत असल्याचा आढळून आला. त्यांनी आत जाऊन पाहिले असता त्यांना बेडरूम मध्ये असलेल्या लाकडी कपाटाचे दरवाजे उघडे व घरातील साहित्य व कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे