शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

घोषणाबाजीवरुन दोन गट भिडले! दगडफेकीत दोन जखमी, ५० जणांविरुद्ध गुन्हा

By संजय पाटील | Updated: October 9, 2022 23:22 IST

पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून परिस्थिती आणली नियंत्रणात

संजय पाटील, अंमळनेर (जि. जळगाव): दुचाकीवर आलेल्या तरुणांनी घोषणाबाजी केल्याच्या कारणावरुन दोन गटात दंगल उसळली. यावेळी झालेल्या दगडफेकीत दोन जण जखमी झाले. ५० जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शहरातील झामी चौकात शनिवारी रात्री घडली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली. या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, झामी चौक भागात शनिवारी रात्री १२.१५ वाजेच्या सुमारास ३० ते ३५ जण मोटार सायकलवर मोठ्याने हॉर्न वाजवत आले. तिथे त्यांनी घोषणाबाजी केली. त्यावेळी भाजीपाला विक्रेते सचिन अशोक महाजन (२५) यांच्यासह काही जणांनी आरडाओरड का करत आहात, याबाबत विचारले. त्यावर या लोकांनी दगडफेक करत शिवीगाळ केली. यात सचिन महाजन व मनोज महाजन हे दोन जण जखमी झाले. यावेळी काही जण मध्यस्थी करण्यासाठी आले असता त्यांना दगडांचा मार बसला. यातून महिलाही सुटल्या नाहीत.

सचिन महाजन यांनी फिर्यादी दिली. यावरुन नावीद शेख, नइम पठाण, गुलाब नबी, साहील आणि अन्य ३० ते ३५ जण (सर्व रा. झामी चौक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या गटातर्फे इम्रान अन्सारी यांनी फिर्याद दिली.  त्यांचे सायकल दुकान व शेजारील फर्निचर दुकानाची तोडफोड करण्यात आली. यात या दुकानांचे सुमारे साडे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यावरुन विशाल चौधरी, मनोज ठाकरे, दीपक पाटील, महेश केबलवाला, अजय नाथबुवा यांच्यासह १० ते १५ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  आरोपींवर कठोर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपींवर पुढील काळातही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे.  कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न केल्यास गय केली जाणार नाही, असे प्रवीण मुंढे (जिल्हा पोलीस अधीक्षक, जळगाव) म्हणाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी