शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

धक्कादायक! लुडोमध्ये हरलेले ५० रुपये न दिल्यानं दोन मित्रांकडून तरुणाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 16:21 IST

चार दिवसांनंतर तरुणाचा मृतदेह सापडला; आरोपींकडून गुन्ह्याची कबुली

अमृतसर: लुडोमध्ये हरलेले ५० रुपये न दिल्यानं दोन मित्रांनी त्यांच्याच साथीदाराची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तीन मित्रांमध्ये पैशावरून वाद झाल्यानंतर हा प्रकार घडला. आरोपी त्यांच्या मित्राला दारू पिण्याच्या बहाण्यानं घेऊन गेले. त्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. त्यांनी मित्राचा मृतदेह घरापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या एका खड्ड्यात फेकला.मित्रांनीच मित्राची हत्या केल्याची घटना १४ जुलैला घडली. मात्र पोलिसांना ४ दिवसांनंतर मृतदेह सापडला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबाकडे सोपवण्यात आला. सुखजिंदर सिंह १४ जुलैला त्याचे मित्र विशालदीप सिंह आणि मनीसोबत एका ई-रिक्षामध्ये बसून लुडो खेळत होता, अशी माहिती त्याचा भाऊ अवतार सिंहनं दिली. सुखजिंदर सिंह लुडोमध्ये ५० रुपये हरला. त्यानं पैसे न दिल्यानं तिघांमध्ये वाद झाला. त्यानंतर विशालदीप आणि मनीनं सुखजिंदरला मारहाण केली. त्यामुळे सुखजिंदरनं विशालदीपच्या ई-रिक्षाची काच फोडली. त्यानंतर त्यांच्यातला वाद मिटला. यानंतर आरोपीचे आणखी काही मित्र तिथे आले. ते सुखजिंदरला दारू पिण्याच्या बहाण्यानं घेऊन गेले, अशी माहिती अवतार सिंहनं दिली.सुखजिंदर घरी न परतल्यानं अवतार सिंहनं आसपासच्या भागात असणारे सीसीटीव्ही तपासले. त्यात आरोपी सुखजिंदरला जबरदस्तीनं ई-रिक्षामध्ये बसवून नेत असल्याचं दिसून आलं. त्यानंतर अवतारनं त्याचा भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी त्याच रात्री गुरू तेग बहादूर नगरजवळ असलेल्या एका मोठ्या खड्ड्यातून सुखजिंदरचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली. केवळ ५० रुपयांसाठी हत्या केल्याची कबुली त्यांनी पोलीस चौकशीत दिली.