शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

मारहाण केल्याच्या कारणावरुन थेरगावमध्ये दोन कुटुंबात हाणामारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 17:32 IST

याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

पिंपरी : मारहाण केल्याच्या कारणावरुन थेरगाव येथील दगडूपाटील नगर येथे दोन कुटुंबात हाणामारी झाली. ही घटना मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. इजहार जुमनअली मोहंमद (वय ४५, रा. वहिनीसाहेब कॉलनी, दगडूपाटील नगर, थेरगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शौकत हमीद शेख (वय ४५,रा. वहिनीसाहेब कॉलनी, थेरगाव) याच्यासह त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शौकत शेख याच्या मुलाने फिर्यादी मोहंमद यांच्या भावास मारहाण केली होती. म्हणून मोहंमद यांनी शेखला विचारणा केली असता त्याच्या पत्नीने मोहंमद यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. यासह शेखने देखील मोहंमद यांना बांबुने डोक्यात मारहाण केली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करत आहेत.तर शौकत हमीद शेख (वय ४५, रा. वहिनीसाहेब कॉलनी, थेरगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मोहम्मद इजहार (रा. वहिनीसाहेब कॉलनी, थेरगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास इजहार याने शौकत शेख यांच्या मुलाला मारहाण केली. याबाबत शेख यांनी त्याला विचारणा केली असता इजहारने त्यांना शिवीगाळ करीत दगड मारल्याने त्यांच्या डोळ्याखाली इजा झाली. तसेच शेख यांच्या पत्नीलाही शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस