शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

तीन कामगारांच्या मृत्युप्रकरणी ठेकेदाराच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 21:57 IST

मीरारोडच्या जुनी म्हाडा वसाहतमागे पालिकेचे मलनिस्सारण केंद्र देखभाल व व्यवस्थापने साठी एसपीएमएल इन्फ्रा या ठेकेदार कंपनीस दिले आहे. बुधवारी या केंद्रातील पॉकलेटर ड्रेन चेंबर साफ करण्यासाठी गेलेल्या मुझफ्फर मोहलिक (२४), अब्दुल रफिक मंडल (५५) व मफिजुल मीराज मंडल (१९) या तीन कामगारांचा वायुने गुदमरुन व टाकीतील सांडपण्यात बुडून मृत्यु झाला होता.

ठळक मुद्देस्थानिक रहिवाशांसह शिवसेना, काँग्रेसच्या नेत्यांनी या घटनेस महापालिका व ठेकेदाराचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप करत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती.बुधवारी या केंद्रातील पॉकलेटर ड्रेन चेंबर साफ करण्यासाठी गेलेल्या मुझफ्फर मोहलिक (२४), अब्दुल रफिक मंडल (५५) व मफिजुल मीराज मंडल (१९) या तीन कामगारांचा वायुने गुदमरुन व टाकीतील सांडपण्यात बुडून मृत्यु झाला होता.

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या मलनिस्सारण केंद्रातील टाकी सफाईच्या कामादरम्यान तीन कामगारांच्या मृत्युप्रकरणी काशिमीरा पोलीसांनी ठेकेदाराच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील दोन आरोपींना आज पोलीसांनी अटक केली आहे.मीरारोडच्या जुनी म्हाडा वसाहतमागे पालिकेचे मलनिस्सारण केंद्र देखभाल व व्यवस्थापने साठी एसपीएमएल इन्फ्रा या ठेकेदार कंपनीस दिले आहे. बुधवारी या केंद्रातील पॉकलेटर ड्रेन चेंबर साफ करण्यासाठी गेलेल्या मुझफ्फर मोहलिक (२४), अब्दुल रफिक मंडल (५५) व मफिजुल मीराज मंडल (१९) या तीन कामगारांचा वायुने गुदमरुन व टाकीतील सांडपण्यात बुडून मृत्यु झाला होता.स्थानिक रहिवाशांसह शिवसेना, काँग्रेसच्या नेत्यांनी या घटनेस महापालिका व ठेकेदाराचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप करत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. तर पालिकेस सतत तक्रारी करुन सुध्दा डोळेझाक केल्याचा आरोप रहिवाशांनी केला. महापौर डिंपल मेहता, आयुक्त बालाजी खतगावकर, कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांना सुध्दा रहिवाशांच्या रोषास सामोरे जावे लागले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजना मोकलीकर यांच्या फिर्यादी नंतर ठेकेदार कंपनीचे मलनिस्सारण केंद्र प्रमुख नरेंद्र अंतड, सुपरवायझर प्रिन्स संतोष सिंग व उपठेकेदार अंडवरा बीबी पथर या तीघां विरोधात तीन कामगारांच्या मृत्युस जबाबदार असल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांनी अंतड व सिंग या दोघा आरोपींना अटक केली आहे. तर पथर चा शोध सुरु आहे. कामगारांना सुरक्षेची कोणतीच साधने ठेकेदाराने उपलब्ध करुन दिली नव्हती. त्यांना कामाची माहिती व प्रशिक्षण दिले गेले नव्हते. सदर कामगारा नाक्या वरुन आणण्यात आल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. पालिकेचे मलनिस्सारण प्रकल्पाचे अभियंता विश्वनाथ देशमुख , शहर अभियंता शिवाजी बारकुंड व वाकोडे यांनी सुध्दा रहिवांच्या तक्रारीसह येथील कामकाजा कडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर सुध्दा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. महत्वाचे म्हणजे आयुक्तांनी बारकुंड यांना चौकशी करुन गुन्हा दाखल करण्यास सांगीतले असता त्यांनी चौक शीच केली नसुन गुन्हा देखील पोलीसांच्या फिर्यादीवरुन स्वत: निरीक्षक वैभव शिंगारे यांनी दाखल केला आहे.  

टॅग्स :Arrestअटकmira roadमीरा रोडPoliceपोलिस