शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

दोघा मद्यपींनी सेवानिवृत्त सैनिकाला भोसकले; नाशिकमध्ये दोन दिवसांत दुसरा खून 

By अझहर शेख | Updated: November 27, 2023 22:57 IST

म्हसरूळ-आडगाव लिंकरोडवरील स्मशानभूमीजवळ दोघे संशयित मद्यपी रस्त्यावर उभे राहून धिंगाणा घालत होते. ये-जा करणारी वाहने अडवून त्यांना दमबाजी करत होते.

नाशिक  : शहरात खुनाचे सत्र पुन्हा सुरू झाले असून सोमवारी (दि.२७) लुटमारीच्या इराद्याने दोघा मद्यपींनी एका सेवानिवृत्त सैनिकाला संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास त्याच्या कुटुंबीयांसमोर धारधार शस्त्राने भोसकल्याची घटना म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. रविदत्त राजेंद्र चौबे (४७,रा. मेट होस्टेल, निशांत गार्डन, धात्रकफाटा) असे मयत झालेल्या इसमाचे नाव आहे. म्हसरूळ पोलिसांनी दोघा संशयित हल्लेखोरांना पाठलाग करून तत्काळ ताब्यात घेतले.

म्हसरूळ-आडगाव लिंकरोडवरील स्मशानभूमीजवळ दोघे संशयित मद्यपी रस्त्यावर उभे राहून धिंगाणा घालत होते. ये-जा करणारी वाहने अडवून त्यांना दमबाजी करत होते. याचवेळी चौबे हे त्यांच्या मोटारीने कुटुंबीयांसोबत या रस्त्याने मार्गस्थ होत असताना त्यांच्यासमोर या मद्यपींनी अन्य वाहनांच्या काच दगडाने फोडली. ते बघून त्यांनी त्यांची कार रस्त्याच्या बाजूला उभी करून त्या संशयितांच्या दिशेने धाव घेतली. यावेळी अंधाराचा फायदा घेत ते काही अंतर पुढे पळाले, यावेळी झालेल्या झटापटीत संशयितांनी त्यांच्याजवळील धारधार शस्त्राने चौबे यांच्या छातीत भोसकले. घाव खोलवर लागल्याने रक्तबंबाळ अवस्थेत ते कोसळले. घटनेची माहिती मिळताच म्हसरूळ पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी अवस्थेत चौबे यांना पोलिस वाहनातून जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले. त्वरित त्यांचा मृतदेह शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोघा संशयित हल्लेखोरांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत म्हसरूळ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

वायुसेनेचे सेवानिवृत्त सैनिकभारतीय वायुसेनेतून सेवानिवृत्त झालेले रविदत्त चौबे हे धात्रकफाटा येथे मुलामुलींच्या मेट वसतिगृहाचे मुख्य वॉर्डन म्हणून नोकरीला होते. त्यांच्यावर अशाप्रकारे अचानक झालेल्या खुनी हल्ल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांसह अन्य कर्मचारी वर्गाने जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिक