शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगार अटक, ७ गुन्ह्यांची उकल, लाखोंचा मुद्देमाल केला हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 20:28 IST

नालासोपारा : रिक्षा चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या टीमला यश मिळाले आहे. दोन्ही आरोपीकडून ...

नालासोपारा : रिक्षा चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या टीमला यश मिळाले आहे. दोन्ही आरोपीकडून ७ गुन्ह्यांची उकल करून ३ लाख ४० हजार रुपये किंमतीच्या चोरीच्या सात रिक्षाही हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी व सपोनि शिवकुमार गायकवाड यांनी शुक्रवारी दिली आहे.

कुर्ल्याच्या सुभाष नगर येथील जंगली मुकादम चाळीत राहणाऱ्या रिक्षाचालक मदन यादव (४०) यांची ९० हजार रुपयांची रिक्षा चोरीला गेली होती. १४ जूनला दुपारी साडे चार वाजता त्यांनी फादरवाडी नाक्याच्या पुढे रस्त्याच्या कडेला पार्क केलेली रिक्षा चोरट्याने चोरून नेली होती. वालीव पोलिसांनी वाहन चोरीचा गुन्हा दाखल केला होता. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे हद्दिमध्ये सतत वाहन चोरीचे प्रमाण वाढत असल्याने वाहन चोऱ्यांवर आळा घालण्यासाठी वरिष्ठांनी आदेश दिले होते. त्या अनुषंगाने घडणाऱ्या प्रत्येक पाहन चोरीच्या गुन्हयाचे ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजचे परीक्षण गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या टीम मार्फतीने करण्यात येत होते. 

वालीव येथे झालेल्या रिक्षा चोरीच्या गुन्ह्याच्या घटनास्थळी गुन्हे शाखा युनिट दोनचे अधिकारी व अंमलदार यांनी भेट देवून तपास सुरु केला. या गुन्ह्यातील आरोपी ईकबाल उर्फ अकबाल खान (५७) आणि सय्यदअली नाई (३५) या दोघांना १६ जूनला रिक्षासह ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडे पोलीस कोठडीदरम्यान केलेल्या कौशल्यपूर्वक तपासात आरोपी ईकबाल उर्फ अकबाल याने रिक्षा चोरीचे आणखी ६ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीकडून ७ गुन्ह्यांची उकल करत ३ लाख ४० हजार रुपये किंमतीच्या चोरीच्या ७ रिक्षाही हस्तगत केल्या आहेत. ईकबाल उर्फ अकबाल हा सराईत आरोपी असून त्याच्या विरोधात मुंबईत १२ गुन्हे यापूर्वी दाखल आहेत.

सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहा. पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक समीर अहिरराव, सपोनि सोपान पाटील व सागर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अजित गीते, सहा. फौजदार रमेश भोसले, संजय नवले, मुकेश पवार, रवींद्र पवार, चंदन मोरे, पोलीस हवालदार प्रफुल्ल पाटील, सचिन पाटील, जगदीश गोवारी, दादा आडके, सुधीर नरळे, राहुल कर्पे, प्रशांत ठाकूर, अनिल साबळे, प्रतिक गोडगे, राजकुमार गायकवाड, मसुब अविनाश चौधरी आणि सायबरचे सहा. फौजदार संतोष चव्हाण यांनी केली आहे.

टॅग्स :nalasopara-acनालासोपाराCrime Newsगुन्हेगारी