शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

लाच म्हणून दारू व मटनाची पार्टी घेणाऱ्या मंडळ अधिकारी व तलाठ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 11:12 IST

Two arrested for taking liquor and mutton party as bribe : मंडळ अधिकारी विलास साहेबराव खेडेकर (रा. लाखनवाडा) आणि शिर्ला नेमाणे येथील तलाठी बाबुराव उखर्डा मोरे (रा. किन्ही महादेव, खामगाव) या दोघांना अटक केली आहे.

बुलडाणा: भावाच्या नावे घेतलेल्या प्लॉटची सातबारावर नोंदणी करून फेरफार नक्कल देण्यासाठी दहा हजार रुपये स्वीकारून चक्क दारू व मटनाची पार्टी घेणाऱ्या मंडळ अधिकारी व तलाठ्यास बुलडाणा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मद्य व मटनावर तावमारतांनाच रंगेहात अटक केली आहे. विशेष म्हणजे या कारवाईत चाल लुचपत प्रतिबंधक विभागाने दोन मद्याच्याही बाटल्या जप्त केल्या आहेत.लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने २८ मे रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजेदरम्यान खामगाव तालुक्यातील पिंप्री धनगर शिवारातील प्रल्हाद चव्हाण नामक व्यक्तीच्या शेतातील झोपडीसमोर ही कारवाई केली. या कारवाईत लाखनवाडा येथील मंडळ अधिकारी विलास साहेबराव खेडेकर (रा. लाखनवाडा) आणि शिर्ला नेमाणे येथील तलाठी बाबुराव उखर्डा मोरे (रा. किन्ही महादेव, खामगाव) या दोघांना अटक केली आहे.खामगाव तालुक्यातील शिर्ला नेमाणे येथील एका ४२ वर्षीय व्यक्तीने त्याच्या भावाच्या नावाने प्लॉट घेतला होता. त्याची सातबारा नोंद घेऊन फेरफार नक्कल देण्यासाठी लाखनवाडा येथील मंडळ अधिकारी विलास साहेबराव खेडेकर आणि तलाठी बाबुराव उखर्डा मोरे यांनी दहा हजार रुपयांची लाच आणि मद्य व मटनाची पार्टी मागितली होती. यातील दहा हजार रुपये यापूर्वी उपरोक्त दोन्ही आरोपींना देण्यात आले होते. मटनाच्या पार्टीसाठी तेवढा आरोपींचा आग्रह सुरू होता. याप्रकरणी त्रस्त झालेल्या व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्या आधारावर सापळा रचून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मंडळ अधिकारी व तलाठ्यास अटक केली. या कारवाईत एसीबीचे पोलिस उपअधीक्षक संजय चौधरी, पोलिस निरीक्षक सचीन इंगळे, पोलिस नाईक विलास साखरे, प्रवीण बैरागी, मोहम्मद रिझवान, विनोद लोखंडे, अझरुद्दीन काझी, नितीन शेटे, शेख अर्शद यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

ताव मारत असतानाच कारवाई२८ मे रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजे दरम्यान तक्रारदाराकडून खामगाव तालुक्यातील पिंप्री धनगर येथील प्रल्हाद चव्हाण यांच्या शेतातील झोपडीसमोर दारू व मटनाची पार्टी सुरू असतानांच एसीबीचे पोलिस उपअधीक्षक संजय चौधरी व त्यांचे सहकारी पोहोचले व त्यांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. सोबतच मद्याच्या दोन बाटल्याही जप्त केल्या. कारवाईदरम्यान नाशवंत असलेले पदार्थ तेथेच पंचासमक्ष नष्ट करण्यात आले. म्हणजे ज्यावर आरोपी ताव मारत होते ते खाद्यपदार्थही एसीबीने तेथे नष्ट केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाBribe Caseलाच प्रकरणAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग