शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या दोघांना ठाण्यातून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2020 01:12 IST

Thane Crime news : ठाण्यातील सिडको बस थांब्यावर दोघे जण बिबट्याच्या कातडीची विक्री करण्यासाठी येणार असल्याची टीप पोलीस हवालदार गणेश बडगुजर यांना मिळाली होती.

ठाणे : बिबट्याच्या कातडीची दहा लाख ९० हजारांमध्ये तस्करी करणाऱ्या सचिन भोसले (३३) आणि शहाजी दांडे (३२) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने नुकतीच अटक केली. त्यांच्या झडतीमध्ये बिबट्याचे कातडे हस्तगत करण्यात आले आहे.|ठाण्यातील सिडको बस थांब्यावर दोघे जण बिबट्याच्या कातडीची विक्री करण्यासाठी येणार असल्याची टीप पोलीस हवालदार गणेश बडगुजर यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अविराज कुऱ्हाडे, संदीप बागुल, योगेश काकड तसेच पोलीस हवालदार शिवाजी गायकवाड, संभाजी मोरे, सुनील माने, रवींद्र काटकर, बडगुजर, भगवान हिवरे आदींच्या पथकाने २३ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास सिडको बस थांबा येथे सापळा लावला. त्या वेळी तिथे आलेल्या सचिन आणि शहाजी या दोघांना या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीमध्ये त्यांच्याकडून बिबट्याचे कातडे हस्तगत करण्यात आले. या कातड्याची दहा लाख ९० हजारांमध्ये विक्री करणार होते, अशी त्यांनी कबुली दिली. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात २४ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना सुरुवातीला २६ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. त्यानंतर ९ नोव्हेंबपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी