शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सराफाला दोन कोटीला लुटणाऱ्या दोघांना अटक, वसईतून घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 03:21 IST

सराफ मालकाचे हात-पाय बांधून सहका-याच्या मदतीने रोख रकमेसह साडेसहा किलो सोन्याच्या दागिन्यांसह तब्बल एक कोटी ९० लाखांचा ऐवज लुटणाºया नोकरासह दोघा जणांना पोलिसांनी शिताफीने अटक केली.

मुंबई  - सराफ मालकाचे हात-पाय बांधून सहकाºयाच्या मदतीने रोख रकमेसह साडेसहा किलो सोन्याच्या दागिन्यांसह तब्बल एक कोटी ९० लाखांचा ऐवज लुटणाºया नोकरासह दोघा जणांना पोलिसांनी शिताफीने अटक केली. राणाराम खुमाराम पुरोहित उर्फ नरेश उर्फ रणवीर (२१, रा. खिलोडी, सितलवाना, राजस्थान), पुखराज शैतानराम भिल (२१, रा. बोली, चोतना, राजस्थान) अशी त्यांची नावे असून गुन्हा अन्वेषण शाखेच्या कक्ष-५ च्या पथकाने त्यांना वसई परिसरातून शनिवारी सकाळी अटक केली.दोघांनी बुधवारी भरदिवसा माहीममधील मोरी रोडवरील अभिषेक ज्वेलर्समधून हा ऐवज लंपास केला होता. राणाराम हा या दुकानात काही महिन्यांपासून खोटे नाव सांगून काम करत होता. दुकान लुटल्यानंतर ते वसईतील एका घरात लपून बसले होते.अभिषेक ज्वेलर्समध्ये गुरुवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास राणारामने मित्राच्या साहाय्याने दुकान मालकाला मारहाण करून तोंडात बोळा घातला. त्यांचे हातपाय बांधून दुकानातील साडेसहा किलो सोने, साडेनऊ किलो चांदीचे दागिने, ७ लाख ८६ हजारांची रोकड, रिव्हॉल्वर, सहा काडतुसे घेऊन पलायन केले होते. गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट-५ च्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज व परिसरातून माहिती घेतल्यानंतर नोकराने चोरी केल्याचे स्पष्ट झाले. तो वसईतील एका ठिकाणी लपून बसला असल्याचे समजले. त्यानुसार शनिवारी सकाळी त्यांना पकडले. उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखालील कक्ष-५ चे प्रभारी निरीक्षक अशोक खोत, निरीक्षक योगेश चव्हाण, विश्वनाथ जाधव आदींनी आपल्या पथकासह या कारवाईत भाग घेतला.राणारामने दुपारी दुकानात वर्दळ नसतानाची वेळ निश्चित करून काम फत्ते केले. मात्र चोरलेला माल जादा असल्याने तो सोबत घेऊन प्रवास करणे धोक्याचे असल्याने त्यांनी वसईत थांबून माल विकण्याचे प्रयत्न केले होते, मात्र मोठ्या प्रमाणात दागिने असल्याने त्यांना योग्य गिºहाईक भेटत नव्हते, त्याच दरम्यान पोलिसांना त्यांचा ठावठिकाणा लागला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक