शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील खून प्रकरणी दोघांना लातुरात अटक; सासवड-दिवेघाटात फेकून दिला होता मृतदेह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 21:35 IST

पुणे येथील एका कार चालकाचा खून करुन मृतदेह २७ आॅगस्ट रोजी रात्री सासवड-दिवेघाटात फेकून देऊन त्याच्या कारची विक्री करण्यासाठी लातुरात आलेल्या दोघांना लातूर पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री कारसह अटक केली. 

लातूर : पुणे येथील एका कार चालकाचा खून करुन मृतदेह २७ आॅगस्ट रोजी रात्री सासवड-दिवेघाटात फेकून देऊन त्याच्या कारची विक्री करण्यासाठी लातुरात आलेल्या दोघांना लातूर पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री कारसह अटक केली. पोलिसांनी सांगितले, पुण्यातील खराडी येथील कार पार्इंटवरुन उबेर टॅक्सी (एम. एम. १२ एन. बी. ३८२०)आरबाज उर्फ मज्जू अमीन शेख (२३), समीर कासीम शेख (३० रा. शिराळा ता. कुर्डूवाडी जि. सोलापूर हल्ली मुक्काम फुरसंगी ता. हवेली जि. पुणे) यांनी भाड्याने ठरविली. दरम्यान, कारचालकाला २७ आॅगस्ट रोजी रात्री करमाळा येथे जायचे असे सांगण्यात आले होते. फुरसंगी गावच्या रेल्वेगेटनजीक कार चालक विजय देवराव कापसे (४०, रा. उमापूर ता. गेवराई, ह.मु. विमान नगर, पुणे) यांचा गळा आवळून व दगडाने डोक्यात मारहाण करण्यात आली. यामध्ये ते बेशुद्घ पडले. त्यांना कारच्या डिक्कीत कोंबण्यात आले. रात्रीच्या वेळी ही कार सासवड घाटाकडे सुसाट निघाली अन् दिवेघाटात ही कार थांबविण्यात आली. डिक्कीतून कारचालकाला काढून पुन्हा दगडाने ठेचून मारण्यात आले. यामध्ये कारचालक कापसे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर तो मृतदेह जंगलात फेकून ही कार लातूरच्या दिशेने निघाली. दरम्यान, या कारची लातुरात विक्री होणार असल्याची माहिती मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सिग्नल कॅम्प परिसरात सापळा लावला. यावेळी पांढ-या रंगाची कार दाखल झाली. या कारसह पोलिसांनी आरबाज उर्फ मज्जू  अमीन शेख आणि समीर कासीम शेख याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता या घटनेला कलाटणी मिळाली. कारचालकाचा खून करुन त्याच्या ताब्यातील कार विक्रीसाठी आपण लातुरात आणली होती, अशी कबुली त्या दोघांनी दिली. पथकात स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि लक्ष्मण कोमवाड, पोहेकॉ अंगद कोतवाड, गोरख शिंदे, खुर्रम काझी, संपत फड, युसूफ शेख, भागवत कठारे, भिष्मानंद साखरे, सोनटक्के यांचा समावेश होता.

पैशासाठी ठेचून खून केला; आरोपींची कबुली आरबाज हा कर्जबाजारी असून, तो एका खाजगी कंपनीत नोकरीला होता. कर्जबाजारीपणामुळे तो गेल्या काही दिवसापासून त्रस्त होता. यातून आपली सुटका व्हावी, यासाठी त्याच्यासह चुलतभावाने एक शक्कल लढविली. कार भाड्याने घेण्याचा बहाणा करुन, कारचालकाचा खून करण्यात आला. त्या कारची विक्री करायची अन् मिळणारे पैसे वाटून घ्यायचे. हा कट त्यांनी गेल्या काही दिवसांपासून रचला होता. यातून कारचालक विजय कापसे यांचा खून करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :ArrestअटकMurderखून