शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात दागिने लंपास करणारे दोघे अटकेत, १७ लाख २८ हजारांचा ऐवज हस्तगत

By अजित मांडके | Updated: April 13, 2024 15:33 IST

या दोघांनी ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रात ११ तर, मुंबई शहरात ६ असे एकूण १६ गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

ठाणे : बाजारपेठ, सार्वजनिक रस्त्यांवर लोकांना बोलण्यात गुंतवून, बतावणी करुन त्यांची फसवणुक करुन त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून लंपास करणाऱ्या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या उल्हासनगर युनीटने अटक केली आहे. मुंबई, ठाणे परिसरातील १६ गुन्हे त्यांनी केल्याचे उघडकीस आले आहे. तर त्यांच्याकडून १७ लाख २८ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अनिल शेट्टी (३३)  आणि रमेश जयस्वाल (४७) दोघेही रा. मंलगगड रोड, भालगाव, अंबरनाथ अशी आहेत. ठाणे ते बदलापूरपर्यंतच्या शहरातील बाजारपेठ, सार्वजनिक रस्ता अशा ठिकाणी नागरिकांना बोलण्यात गुंतवून भामटे त्यांच्याकडील दागिने लंपास करीत असल्याच्या घटना वाढू लागल्या होत्या. याप्रकरणी नौपाडा, उल्हासनगर, बदलापुर पुर्व, शिवाजीनगर, अंबरनाथ, विठ्ठलवाडी, महात्मा फुले चौक, डोंबिवली तसेच जिल्ह्यातील इतर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु आरोपी गुन्ह्याची आणि राहण्याची जागा सातत्याने बदलत असल्यामुळे त्यांना पकडणे शक्य होत नव्हते. 

या प्रकरणाचा संमातर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या उल्हासनगर युनीटचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक कोळी यांच्या पथकाने सुरू केला होता. या पथकाने तपास करून अनिल आणि रमेश या दोघांना अटक केली. या दोघांनी ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रात ११ तर, मुंबई शहरात ६ असे एकूण १६ गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे, अशी माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली. ठाणे पोलिस आयुक्तालयात केलेल्या ११ गुन्ह्यातील १७ लाख २८ हजारांचा ऐवज दोघांकडून जप्त करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी