नवी मुंबई : सानपाडा गोळीबारप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी दोघांना अटक केली. यापैकी एकाला पुण्यातून अटक केल्यानंतर गुन्ह्याचा उलगडा झाला आहे. ठेकेदार राजाराम टोके यांना मार्गातून हटवण्यासाठी त्यांच्याच जुन्या सहकाऱ्यांनी हा हल्ला केल्याचे चौकशीत समोर आले आहे.
एपीएमसी भाजी मार्केटमधील कचरा उचलण्याचे काम करणारे ठेकेदार राजाराम टोके यांच्यावर गोळीबार करून हत्येचा प्रयत्न झाला होता. दुचाकीवरून आलेल्यांनी पाच राऊंड गोळ्या झाडून पळ काढला होता. मात्र, वेळीच उपचार मिळाल्याने टोके यांचे प्राण वाचले होते. याप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी संतोष गवळी याला पुण्यातून अटक केली. त्याशिवाय कटात सहभागी असलेल्या इतरही एकाला पकडून सानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्या चौकशीत टोके यांच्या ठेक्यातल्या जुन्या भागीदारांनी कट रचून त्यांना मार्गातून कायमचे हटवण्यासाठी हल्ला केल्याचे समोर आले आहे.
मुख्य आरोपी फरारगोळीबारनंतर गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीवरून पोलिसांनी मारेकरूंचा शोध घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी गुन्ह्यातली दुचाकी सापडली आहे. तिचा चेसिज नंबर मिटवून बनावट नंबरप्लेट लावून वापरली जात होती. तर पुण्यातून अटक केलेला गवळी हा घटनेवेळी दुचाकी चालवत होता. मात्र, गोळीबार करणारा आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही.