शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बँक फ्रॉडप्रकरणी हैदराबादहून दोघांना २५ लाखासह अटक; सुधीर भटेवरा फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 03:16 IST

१३ जणांना २२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी, अनघा मोडक हिच्या घराची तसेच कार्यालयाची झडती घेतली असून, दोन्ही ठिकाणांवरुन ७ हार्डडिस्क व एक टॅब जप्त करण्यात आला आहे.

पुणे : नामांकित बँकेमधील डारमेंट खात्याच्या डेटा प्रकरणात सायबर पोलिसांनी हैदराबादहून आणखी दोघांना अटक केली. दरम्यान, ज्याच्या घरासमोर पोलिसांनी २५ लाखासह तिघांना पकडले होते, तो सुधीर भटेवरा हा फरार झाला आहे. याप्रकरणी आतापर्यंत १३ जणांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना २२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. लक्ष्मीनारायण गुट्टू ऊर्फ सोन्या (वय ३२, रा. बौद्धनगर, हैदराबाद) आणि व्यंकटेश सुब्रम्हण्यम उपाला (वय ४०, रा. भांदलागुंडा, नागोल, हैदराबाद), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी अनघा मोडक हिच्या मोबाईल फोनच्या माहितीचे एक्सट्रॅक्शन केले असता, त्यातील संभाषणामध्ये सर्व आरोपींचा उल्लेख व त्यांच्याशी बोलणे झाल्याचे आढळून आले आहे. रोहन मंकणी, राजेश शर्मा, परमजितसिंग संधू आणि अनघा मोडक हे सर्व जण १० व १२ मार्च रोजी नवी पेठेतील सॅफरॉन हॉटेलमध्ये एकत्र आले होते. त्यांनी तेथे बराच वेळ थांबून चर्चा केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्यात काय चर्चा झाली, त्याची माहिती घ्यायची आहे.

अनघा मोडक हिच्या घराची तसेच कार्यालयाची झडती घेतली असून, दोन्ही ठिकाणांवरुन ७ हार्डडिस्क व एक टॅब जप्त करण्यात आला आहे. या लॅपटॉपचा तिने गुन्ह्यासाठी वापर केला आहे का? या गुन्ह्यात एका बँकेतील एक खाते व अन्य बँकेतील तीन खात्यांची माहिती संबधित बँकेने सादर केली असून, त्या खात्यांमध्ये २०९ कोटी रुपये असल्याची माहिती मिळाली आहे. या खात्यातील पैसे आरोपी हे कोणत्या प्रकारे हॅक करून त्यातील रक्कम ही एका बँक खात्याव्यतिरिक्त अन्य कोणत्या खात्यावर कशाप्रकारे ट्रान्सफर करणार होते, याचा तपास करायचा आहे.

शिल्लक खात्यांची  माहिती आली कामी लक्ष्मीनारायण गुट्टू याने राजशेखर ममीडी (रा. हैदराबाद) यांच्या व्हॉटस्अ‍ॅ‌पवर २५ कोटी ७७ लाख ७८ हजार ९०८ रुपये तसेच दुसऱ्या व्हॉटस्अ‍ॅ‌पवर ३ कोटी ५ लाख ६० हजार ३५५ रुपयांच्या किमतीची शिल्लक असलेल्या खात्यांची माहिती पाठविल्याचे मिळून आले आहे. त्याबाबत त्यांच्याकडे तपास करायचा आहे, अशी माहिती सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी न्यायालयात दिली. न्यायालयाने सर्वांना अधिक तपासासाठी २२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

टॅग्स :bankबँकfraudधोकेबाजी