शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कॉलेजमधील तरुणांना ड्रग विकणारे जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 03:36 IST

शाळा-महाविद्यालयांसह मॉलच्या आवारात विद्यार्थ्यांना एक्स्टसी (एमडीएमए) या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या तरुणाला अमली पदार्थविरोधी पथकाने जेरबंद केले.

मुंबई : शाळा-महाविद्यालयांसह मॉलच्या आवारात विद्यार्थ्यांना एक्स्टसी (एमडीएमए) या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या तरुणाला अमली पदार्थविरोधी पथकाने जेरबंद केले. उत्कर्ष पतंगे (२५) असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्याकडून एमडीएमएच्या ९७ गोळ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. एमडीएमए हे पार्टी ड्रग म्हणून ओळखले जाते.पतंगे हा मालाडचा रहिवासी आहे. त्याच्याकडून एकूण ४ लाख ८५ हजार रुपये किमतीचा ड्रगचा साठा जप्त करण्यात आला आहे. पतंगेने पश्चिम उपनगरातील उच्चभ्रू वस्त्यांसह शाळा, महाविद्यालय, मॉल परिसरात येणाºया विद्यार्थ्यांना टार्गेट केले. त्यांना हेरून तो या पार्टी ड्रगची विक्री करत असे. याबाबत एएनसीचे पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांना माहिती मिळताच त्यांनी सापळा रचत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. त्याने हा साठा कुठून व कसा मिळवला याबाबत त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. उत्कर्षकडून पथकाने जांभळ्या रंगाच्या गोळ्या हस्तगत केल्या आहेत. त्यावर ‘आॅडी’ असा शिक्का आहे. हा नवीनच प्रकार असून याबाबतही अधिक तपास सुरू आहे.हे ड्रग पश्चिमेकडील देशांमध्ये होत असल्याची माहिती समोर येत आहे. तेथून चोरट्या मार्गांनी ते भारतात आणले जाते. उत्कर्षसारख्या तरुणांना हाताशी घेत त्याची सर्रासपणे विक्री होत असल्याचे समजते. याबाबत एएनसी अधिक तपास करत आहेत. त्याच्या अन्य साथीदारांचा शोधही सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थ