शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
Manoj Jarange Patil Morcha Live: मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल; हजारो आंदोलकांसोबत मनोज जरांगे आझाद मैदानाकडे
3
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
4
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
5
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
6
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
7
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
8
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
9
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
10
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
11
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
12
अमेरिकने कितीही दम दिला, तरी उत्पादनात भारताची झेप
13
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
14
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
15
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
16
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
17
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
18
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
19
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
20
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात

अडिच किलोचे हस्तिदंत तस्करी करणाऱ्या दुकलीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 23:46 IST

शोभेच्या वस्तू, औषधे आदींकरिता वापर होत असल्याने हस्तिदंताला आंतरराष्ट्रीय बाजारात विशेष महत्त्व आहे.

ठळक मुद्देया दोघांकडून पोलिसांनी 2 किलो 141 ग्रॅमचे हत्तीदंत जप्त केले आहेत.जप्त केलेले हत्तीच्या दोन सुळ्यांचे तुकडे वनविभागामार्फत करण्यात आलेल्या तपासणीमध्ये हे दात अस्सल असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबई - घाटकोपर परिसरात हस्तिदंत विकण्यासाठी आलेल्या दोघांना मुंबई गुन्हेच्या कक्ष 7 च्या पोलिसांनीअटक केली असून त्यांच्याकडून हत्तीच्या दोन सुळ्यांचे तुकडे जप्त केले आहेत.  

बिहार राज्यातून हस्तिदंत आणल्याचे प्राथमिक पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र, ते कोणाला विकणार होते, याविषयी अद्याप स्पष्ट झाले नाही. सचिन पासवान (26) आणि सरोजकुमार उमाशंकर पासवान (24) अशी  या अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघेजण 19 सप्टेंबर रोजी सकाळी घाटकोपर येथील एलबीएस रोडवरील सर्वोदय रुग्णालयाच्याजवळील बसस्थानकावर हस्तिदंत विकण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश तावरे यांच्या पथकाने सापळा रचून या दोघांना अटक केली.या दोघांकडून पोलिसांनी 2 किलो 141 ग्रॅमचे हत्तीदंत जप्त केले आहेत. या दोघांविरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यात 39, 45, 45(अ), 59  वन्यजीव संरक्षन कायदाअन्वये 1972 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जप्त केलेले हत्तीच्या दोन सुळ्यांचे  तुकडे वनविभागामार्फत करण्यात आलेल्या तपासणीमध्ये हे दात अस्सल असल्याचे स्पष्ट झाले आहे. शोभेच्या वस्तू, औषधे आदींकरिता वापर होत असल्याने हस्तिदंताला आंतरराष्ट्रीय बाजारात विशेष महत्त्व आहे. मात्र, दातांची किंमत जाहीर केल्यास दातांच्या तस्करीसाठी हत्तींची हत्या करण्याचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे वनविभागाने या दातांची किंमत जाहीर करण्यास बंदी घातली आहे, तरी अडीच लाखांच्या आसपास या दांतांची किॆमत असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसGhatkoparघाटकोपरforest departmentवनविभागSmugglingतस्करी