शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबाद एन्काऊंटरमध्ये ठार झालेले दोन आरोपी अल्पवयीन? कुटुंबीयांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 12:09 IST

चकमतील ठार झालेल्या हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चार आरोपींपैकी दोन आरोपींच्या कुटुंबीयांनी या आरोपींबाबत धक्कादायक दावा केला आहे.

हैदराबाद - पशुवैद्यक तरुणीवर बलात्कार करणाऱ्या चार आरोपींना हैदराबाद पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केले होते. दरम्यान, या  चकमकीवरून वाद निर्माण झाला असून, ठार झालेल्या चार आरोपींपैकी दोन आरोपींच्या कुटुंबीयांनी या आरोपींबाबत धक्कादायक दावा केला आहे. चकमकीमध्ये ठार झालेल्या आरोपींपैकी दोघे जण हे अल्पवयीन होते, असा दावा आरोपींच्या कुटुंबीयांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगासमोर केला आहे. तसेच या सर्वांना खोट्या चमककीत ठार करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.हैदराबाद बलात्कारकांडातील आरोपींच्या चकमकीवरून वादाला तोंड फुटल्यानंतर या चकमकीच्या चौकशीचे आदेश दिले गेले आहेत.  चकमकीत ठार करण्यात आलेले हैदराबादमधील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी हे नारायणपेट जिल्ह्यातील गुडगंडला आणि जकलैर गावातील रहिवासी होते. या आरोपींपैकी नवीन याच्या आईने सांगितले की, ''नवीन हा माझा एकुलता एक मुलगा होता. त्याला ठार करण्यात आले तेव्हा तो केवळ 17 वर्षांचा होता. त्याचा जन्म 2002 मध्ये झाला होता. काही वर्षांपूर्वी त्याने शाळा सोडली होती. तो जिथे शिकत होता, त्या चिन्ना पोरमा शाळेतील त्याचा शाळा सोडल्याचा दाखला आम्हाला लवकरच मिळेल.''दरम्यान, या प्रकरणातील अजून एक आरोपी शिवा याचे वडील जे. रंजना यांनी मानवाधिकार आयोगाच्या अधिकाऱ्यांसमोर आपले म्हणणे मांडताना चकमकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. माझा मुलगा हत्यारबंद पोलिसांच्या पहाऱ्यातून कसा काय पळून जाण्याचा प्रयत्न करू शकतो? त्याला खोट्या चकमकीत मारले गेले. जर माझ्या मुलाने अपराध केलाही असेल तर पोलिसांनी त्याला न्यायालयाच्या हवाली केले पाहिजे होते.''  तसेच रंजना यांनीही आपला मुलगा अल्पवयीन असल्याचा दावा केला. अन्य दोन आरोपी असलेल्या चेन्नाकेशवुलू आणि मोहम्मद आरिफ यांच्या वडिलांनीही मानवाधिकार आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत आपल्या मुलांना खोट्या चकमकीत मारण्यात आल्याची शंका व्यक्त केली.  हैदराबादमध्ये २७ वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या पीडितीला जाळून मारण्यात आले होते. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. दरम्यान, या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींचा पोलिसांनी शुक्रवारी एन्काऊंटर  केला. यामध्ये चारही जणांचा मृत्यू झाला. अधिक तपासासाठी आरोपींना घटनास्थळी  नेण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांच्या तावडीतून या आरोपींनी निसटण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही ते पळून जात होते. अखेर पोलिसांनी गोळीबार केला. त्यात या चारही आरोपींचा मृत्यू झाला. 

टॅग्स :hyderabad caseहैदराबाद प्रकरणRapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारी