शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

लिंक लाइक करणं पडलं एकवीस लाखांना! घरबसल्या काम शोधताना महिलेची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 21:57 IST

याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे...

सातारा : घरबसल्या इन्स्टाग्रामवर ऑनलाइन काम आहे का? हे पाहणाऱ्या महिलेला मोबाइलवर लिंक पाठविण्यात आली. ही लिंक लाईक केल्यास पाठविलेल्या पैशावर वीस टक्के डिस्काऊंट देण्याचे आमिष दाखवून तब्बल २१ लाख ३८ हजारांना गंडा घालण्यात आला. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.मंजुळा राहुल घाडगे (वय ३९, रा. दौलतनगर, सातारा) या त्यांच्या घरी मोबाइलवर ऑनलाइन इन्स्टाग्रामवर काम आहे का, हे पाहत होत्या. त्यावेळी त्यांना ‘फ्लेम स्क्रीबलर’ यांची जाहिरात आली. त्यानंतर संबंधिताने घाडगे यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला. फोनवर तसेच मेसेज करून त्यांना नेमके काय काम आहे, याची माहिती दिली. त्यांनी त्याचे नाव विचारले असता त्याने ‘निरंजना’ असे सांगितले. या निरंजनाने घाडगे यांच्या मोबाइलवर वेगवेगळ्या लिंक पाठविल्या. या लिंक ओपन करून त्यातील प्रोडक्ट लाइक केल्यानंतर घाडगे यांनी पाठविलेल्या पैशांवर २० टक्के डिस्काऊंट देण्याचे त्याने आमिष दाखविले. सुरुवातीला पैसे पाठविल्यानंतर घाडगे यांना डिस्काऊंट मिळाला. त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यामुळे घाडगे यांनी त्यांच्या बँकेच्या खात्यावरून एनईएफटी, आरटीजीएस, नेफ्टद्वारे अशाप्रकारे तब्बल २१ लाख ६८ हजार पाठविले. त्यापैकी त्यांना ३० हजार रुपये परतसुद्धा मिळाले. परंतु २१ लाख ३८ हजार २०० रुपये अद्याप त्यांना परत मिळाले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच घाडगे यांनी इन्स्टाग्रामधारक निरंजना याच्यावर दि. १४ रोजी दुपारी शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक कुमार ढेरे हे अधिक तपास करीत आहेत.

अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या कोणत्याही लिंक ओपन करू नये. निश्चितपणे आपली फसवणूक होईल. यावर उपाय म्हणून स्वत: सतर्क राहणे आणि आपल्या घरातल्यांना जागृत करणे, हा आहे.-अरुण देवकर, पोलिस निरीक्षक, सातारा

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिसcyber crimeसायबर क्राइम