शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

दीड लाख अंड्यांचा ट्रक पळविणाऱ्या टोळीस केले जेरबंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 20:36 IST

१८ नोव्हेंबरला पहाटे 3.15 वाजता पहाटे नबी शेख नावाचा वाहन चालक आपल्या 17 वर्षांच्या मुलासह अंड्यानी भरलेला ट्रक हैदराबादहून अंबरनाथ येथील महाराष्ट्र एग्ज सेंटर येथे खाली करण्यासाठी येत होता.

ठळक मुद्देशिवाजी नगर पोलीस ठाण्यामध्ये आपल्याला मारहाण करून लुटल्याची व अंड्यानी भरलेला ट्रक चोरून नेल्याची तक्रार दिली.१८ नोव्हेंबरला पहाटे 3:15 वाजता पहाटे नबी शेख नावाचा वाहन चालक आपल्या 17 वर्षांच्या मुलासह अंड्यानी भरलेला ट्रक हैदराबादहून अंबरनाथ येथील महाराष्ट्र एग्ज सेंटर येथे खाली करण्यासाठी येत होता.ट्रक चोरल्यानंतर त्यातील 22,000 रुपयाची अंडी त्याने मार्केटमध्ये विकल्याचे कबुल केलं.

ठाणे - हैदराबाद येथुन अंड्यानी भरलेला ट्रक अंबरनाथ बदलापूर रोडवर थांबवून लुटून नेणाऱ्या आरोपींना उल्हासनगर गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे आणि अंड्यानी भरलेला ट्रक हस्तगत केला आहे.

१८ नोव्हेंबरला पहाटे 3.15 वाजता पहाटे नबी शेख नावाचा वाहन चालक आपल्या 17 वर्षांच्या मुलासह अंड्यानी भरलेला ट्रक हैदराबादहून अंबरनाथ येथील महाराष्ट्र एग्ज सेंटर येथे खाली करण्यासाठी येत होता. त्यावेळी अंबरनाथ बदलापूर रोडवर ट्रक घेऊन जात असताना एक मारुती सुझुकी कार त्याच्या ट्रकच्यासमोर आडवी घालण्यात आली.  त्यातून चार इसम उतरून त्यांनी वाहन चालक व त्याचा मुलगा मुज्जमील या दोघांना मारहाण केली.  त्यांना खाली उतरवून मारुती सुझुकीमध्ये कोंबून डोळ्यावर पट्टी बांधून त्याच्या खिशातील दोन हजार रुपये काढून घेतले आणि चारजणांपैकी एकाने ट्रक चोरी करून पळवून नेला. वाहन चालक व त्याच्या मुलाला रायटे टिटवाळा येथील जंगलात निर्जन स्थळी सोडून दिले.त्यानंतर वाहन चालक व त्याच्या मुलाने त्याबाबत अंबरनाथ येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्यामध्ये आपल्याला मारहाण करून लुटल्याची व अंड्यानी भरलेला ट्रक चोरून नेल्याची तक्रार दिली. त्याप्रमाणे पोलीस ठाण्यामध्ये भा. दं. वि. कलम 394, 341, 363, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. उल्हासनगर गुन्हे शाखा कक्ष क्रमांक 4 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास सुरु केला.  त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सालगुडे व श्रीकृष्ण नावले व त्यांच्या पथकाने वाहन चालक व त्याच्या मुलाला डोळे बांधून ज्या ठिकाणाहून नेले होते. त्या ठिकाणापासून तपासला सुरुवात केली तसेच गुप्त बातमीदारांना सक्रिय केले त्यांच्याकडुन माहिती मिळवली असता भिवंडी येथे राहणाऱ्या सादात नावाचा इसम या गुन्ह्यात सहभागी असल्याचे कळले. त्याप्रमाणे त्याला ताब्यात घेतले असता त्याने आपणच चार साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याप्रमाणे भिवंडी वाडा रोडवरील महापोली गावानजिक फक्की गोडावून येथून अंड्यानी भरलेला ट्रक ताब्यात घेण्यात आला.  सादात हा अंडी विक्रीच्या व्यवसायात असल्याने त्याने व त्याच्या मित्रांनी मिळून  अंडयानी भरलेला ट्रक चोरण्याचा प्लान केला होता. ट्रक चोरल्यानंतर त्यातील 22,000 रुपयाची अंडी त्याने मार्केटमध्ये विकल्याचे कबुल केलं. धंद्यात नुकसान झाल्याने व कर्जबाजारी झाल्यामुळे त्याने व त्याच्या मित्रांनी मिळुन अंड्याचा ट्रक चोरल्याचे कबुल केले. पोलिसांनी आतापर्यंत 4,12,766 रुपये किंमतीचे 1,16,400 अंडी, पाच लाखांचा अशोक लेलँन्डचा ट्रक आणि गुन्ह्यात वापरलेली पाच लाख रुपयाची मारुती सुझुकी असा एकूण 14,12,766 रुपये किंमतीचा माल हस्तगत केला आहे. उर्वरित आरोपींना लवकरच़ पकडण्यात येईल असे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी सांगितल.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीulhasnagarउल्हासनगरArrestअटक