शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

TRP Scam: ‘ते’ व्हॉट्सॲप चॅट केवळ दाेन मित्रांमधील संभाषण; वकिलांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 02:41 IST

अनिश्चित काळासाठी तपास सुरू न ठेवण्याचे व गोस्वामींसह अन्य कर्मचाऱ्यांना तपास प्रलंबित असेपर्यंत अटक करू नये, असे निर्देश देण्याची  विनंतीही त्यांनी केली. 

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी व बार्कचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सॲप चॅट हे केवळ दोन जवळच्या मित्रांमधील संभाषण होते. त्याचा टीआरपीशी काहीही संबंध नाही, असे अर्णब यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला सोमवारच्या सुनावणीत सांगितले. 

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कोणते महत्त्वाचे पुरावे दिले आहेत, असा सवाल न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठाने करताच एआरजीतर्फे ज्येष्ठ वकील अशोक मुंदर्गी यांनी सांगितले की, या घोटाळ्यातील महत्त्वाचे पुरावे म्हणजे गोस्वामी व दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सॲप चॅट आहे. संदर्भ सोडून हे चॅट केस उभी करण्यासाठी वापरण्यात आले. दोघेही बाजारातील ट्रेंडविषयी व्हॉट्सॲप चॅटद्वारे गप्पा मारत आहेत. हे चॅट दोन जवळच्या मित्रांमधील आहे. टीआरपी घोटाळ्यासंदर्भात एकही मेसेज त्यात नाही. तर, गोस्वामी यांना मदत करण्यासाठी दासगुप्ता यांनी  रिपब्लिक टीव्हीच्या बाजूने टीआरपी वाढविला होता का?  असा सवाल खंडपीठाने मुंदर्गी यांना केला. त्यावर हे पोलिसांचे म्हणणे आहे; परंतु दोन दोषारोपपत्र सादर करूनही पोलीस हे सिद्ध करू शकले नाहीत. गोस्वामी व एआरजीच्या अन्य कर्मचाऱ्यांना पोलिसांनी केवळ संशयित आरोपी म्हणून दाखविले आहे. पोलीस तपासाला विलंब करून त्यांची छळवणूक करीत आहेत, असे मुंदर्गी यांनी सांगितले. अनिश्चित काळासाठी तपास सुरू न ठेवण्याचे व गोस्वामींसह अन्य कर्मचाऱ्यांना तपास प्रलंबित असेपर्यंत अटक करू नये, असे निर्देश देण्याची  विनंतीही त्यांनी केली. 

चौकशी केली का?  तपास यंत्रणा एखाद्यावर अत्याचार करण्यासाठी तपासाचा साधन म्हणून वापर करीत असेल तर न्यायालय किती प्रमाणात यावर भाष्य करू शकेल? गोस्वामी आणि अन्य कर्मचाऱ्यांना तुम्ही आरोपी करणार नसाल तर हे सर्व व्यर्थ आहे, असे न्यायालयाने नमूद केले, तसेच गोस्वामींना चौकशीसाठी पोलिसांनी बोलावले का? असा प्रश्न विचारला. 

टॅग्स :TRP Scamटीआरपी घोटाळाarnab goswamiअर्णब गोस्वामीHigh Courtउच्च न्यायालय