शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

अजब क्लुप्ती! मोठ्या गाडीला छोट्या गाडीचा FasTag; टोलचे पैसे वाचवायचे एक सो एक फंडे उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 15:36 IST

Fastag Scam: जर एखाद्या वाहनाला फास्टॅग नसेल तर त्याच्याकडून दुप्पट टोल रोखीने वसूल केला जातो. आजही अनेक ठिकाणी फास्टॅग स्कॅन नाही झाला, ब्लॅकलिस्ट दाखवून लुटायचे धंदे सुरु आहेत. आता तर वाहनचालकांनीच एकेक क्लुप्त्या शोधून काढल्या आहेत.

देशात 15 फेब्रुवारीपासून चारचाकी वाहनांपुढील सर्व लहान मोठ्या वाहनांना फास्टॅग (Fastag) कंपल्सरी केला आहे. यामुळे जवळपास सर्व टोल प्लाझांवर (TollPlaza) रोख रक्कम घेणे बंद केले आहे. जर एखाद्या वाहनाला फास्टॅग नसेल तर त्याच्याकडून दुप्पट टोल रोखीने वसूल केला जातो. आजही अनेक ठिकाणी फास्टॅग स्कॅन नाही झाला, ब्लॅकलिस्ट दाखवून लुटायचे धंदे सुरु आहेत. पुण्याजवळच्या साताऱ्याकडे जातानाच्या टोलनाक्यावर तर बनावट पावत्या देऊन लूटालूट सुरु होती. आता वाहनचालकांनीही टोल वाचविण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या शोधून काढल्या आहेत. (Fastag Scam caught on Toll Plaza, big vehicles use small vehicles Fastatg.)

याची झेरॉक्स ठेवा! खात्यात पैसे आहेत, पण FASTag स्कॅन झाला नाही, टोलनाक्यावरून फुकटात जा...

प्रकरण राजस्थानचे आहे. जोधपुर-जैसलमेर हायवेवरील टोलनाक्यावर हुश्शार लोकांनी नवीन जुगाड शोधून काढला आहे. तो पाहून अनेकजण हबकले आहेत. फास्टॅगला पैसे कमी कापले जावेत म्हणून अनेकांनी टेम्पो, ट्रक, बससारख्या वाहनांना कार-जीपचे फास्टॅग लावले आहेत. हा जुगाड गेल्या काही दिवसांपासून सुरु होता. यामुळे टोल नाक्यावर कारच्या पैशांमध्ये बस, ट्रक, टेम्पो निघून जात होते. टोल नाक्यावरील पैशांचे कलेक्शन कमी झाल्याने टोल प्लाजा मॅनेजर सुरेश शर्मांनी लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. तसेच वाहनांची तपासणी सुरु केली तेव्हा हा प्रकार उघड झाला. 

एका बसवर कार कॅटॅगरीचा फास्टॅग लावलेला होता. यामुळे बस गेली तरीही कारचा 90 रुपये टोल कापला जात होता. हा टॅग एका बोलेरो कारचा होता. अशाच प्रकारे अनेक वाहने या टोलनाक्यावरून ये-जा करत होती आणि ही नेहमी ये-जा करणारी वाहने होती. तरीही कोणाला यावर संशय आला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वाहनांचे ड्रायव्हर फास्टॅग काचेवर न लावता खिशात ठेवत होते. टोल नाक्यावर येताच ते पुढे करायचे यामुळे त्यांचा फास्टॅग स्कॅन व्हायचा आणि गेट खुले व्हायचे. अशाप्रकारे ही वाहने तीन टोल नाक्यांवरून जायची ज्याचा टोल मोठ्या वाहनांसाठी 900 रुपये होता तो 270 रुपये वसूल व्हायचा. 

FASTag problems: टोल दोनदा कापला तर काय? FASTag बाबत अद्याप न पडलेले प्रश्न...

स्थानिक दाखविण्यासाठी....स्थानिकांना टोलमाफी करण्य़ात आलेली आहे. यामुळे अनेकांनी बनावट आधार कार्ड बनवून घेतले आहे. हे आधारकार्ड दाखविल्यावर स्थानिक म्हणून सूट दिली जाते. अशाप्रकारे अनेकांनी टोल चोरी करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत 12 हून अधिक आधारकार्ड काढून घेण्यात आली आहेत. 

एकच FASTag दोन गाड्यांना वापरता येतो? जाणून घ्या तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे

टॅग्स :Fastagफास्टॅगtollplazaटोलनाका