शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची जबरदस्त कामगिरी; शर्टच्या बटनवरून माग काढत १० हजार लोकांमधून शोधले मारेकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 18:45 IST

पोलिसांना घटनास्थळी एक चप्पल आणि आरोपीच्या शर्टचे तुटलेले बटन सापडले होते.

ठळक मुद्देऑनलाईन खरेदी केला होता शर्ट आणि सुरासात महिन्यांपासून सूक्ष्म तपास करून पोलिसांनी केला खुनाचा उलगडा

औरंगाबाद: सिल्लोड येथे मे महिन्यात वाईनशॉपच्या कर्मचाऱ्याचा धारदार सुऱ्याने खून करून ४ लाखाची रोकड पळविणाऱ्या त्रिकुटांना अखेर स्थानिक गुन्हेशाखेने बुधवारी बेड्या ठोकल्या. घटनास्थळी सापडलेल्या शर्टच्या गुंडीचा धागा पकडून पोलिसांनी ऑनलाईन शर्ट खरेदी करणाऱ्या दहा हजार लोकांमधून हे आरोपी शोधून काढल्याची माहिती पोलीस अधीक्षक  मोक्षदा पाटीली यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अजय गुलाबराव रगडे (३०,रा. सातारा परिसर), चेतन अशोक गायकवाड(३४,रा. शिक्षक कॉलनी, सिल्लोड) आणि संदीप आसाराम गायकवाड(२६,रा. कैकाडी गल्ली, परतूर, जि. जालना)अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.भिकन निळूबा जाधव (४८)असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील म्हणाल्या की,  तक्रारदार लक्ष्मण पुंजाजी मोरे (४३,रा. जयभवानीनगर, सिल्लोड) हे भराडी येथील वाईनशॉपचे व्यवस्थापक आहेत. तर मृत भिकन हे त्याच दुकानावरील कर्मचारी होते. १२ मे रोजी रविवारी रात्री दिवसभर व्यवसायाचे जमा झालेली चार लाखाची रक्कम घेऊन ते मोटारसायकलने सिल्लोडला जात असताना अनोळखी लुटारूनी दुचाकीला लाथ मारून त्यांना खाली पाडले. यावेळी लक्ष्मण आणि भिकन यांनी पैशाची बॅग घट्ट पकडून ठेवल्याने आरोपींनी त्या दोघांवर धारदार सुऱ्याने हल्ला करून बॅग पळविली होती. याघटनेत भिकन यांचा मृत्यू झाला होता. याविषयी सिल्लोड शहर ठाण्यात खून आणि लुटमारीचा गुन्हा नोंद झाला होता. 

शर्टच्या गुंडीवरून काढला माग पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली  स्थानिक गुन्हेशाखेचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली तेव्हा तेथे त्यांना एक चप्पल आणि आरोपीच्या शर्टचे तुटलेले बटन सापडले होते. बटनवर इंगजीत अक्षर होते. हे अक्षर पोलिसांनी गुगलवर टाकल्यानंतर ऑनलाईन शर्ट  विक्री करणाऱ्या चेन्नईच्या कंपनीचे नाव समोर आले. पोलिसांनी त्या कंपनीशी संपर्क साधून घटनेच्या काही महिन्यापूर्वी ऑनलाईन शर्ट खरेदी करणाऱ्या दहा हजार लोकांच्या नावाची यादी मिळविली. ही यादी तपासल्यानंतर २४६ लोक गुन्हेगारी स्वरुपाचे असल्याचे समोर आले.

ऑनलाईन खरेदी केला होता शर्ट आणि सुरा२४६ जणांमध्ये सातारा परिसरातील अजय रगडे याच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल असून तो वर्षभरापूर्वीच जामीनावर सुटला होता. शिवाय त्याने सुरा आणि शर्ट ऑनलाईन खरेदी केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न समजल्याने पोलिसांनी त्याला उचलले. कसून चौकशीअंती त्याने गुन्ह्याची कबुली देत चेतन आणि संदीप यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे सांगितले.आरोपींकडून लुटलेल्या रक्कमेपैकी २४ हजार रुपये, गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटारसायकल , मोबाईल हॅण्डसेट असा सुमारे १ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. 

३० हजाराचे बक्षीससात महिन्यापासून तपास करीत या गुन्ह्याचा उलगडा करणाऱ्या स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक भागवत फुंदे, उपनिरीक्षक भगतसिंग दुलत, संदीप सोळुंके, कर्मचारी सुधाकर दौड, विठ्ठल राख, नामदेव शिरसाट, सुनील खरात, संजय भोसले, शेख नदीम, विनोद तांगडे, ज्ञानेश्वर मोटे, गणेश गांगवे ,योगेश तरमाळे आणि जीवन घोलप यांना पोलीस अधीक्षकांनी ३० हजार रुपये बक्षीस जाहिर केले.