शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

मुलीच्या उपचारासाठी तिने जीव धोक्यात घालून 17 वेळा केली ड्रग्ज तस्करी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 00:01 IST

शनिवारी शबानाला अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली. तिच्याजवळून सुरक्षा अधिकाऱ्यांनी २.५ किलो चरस हस्तगत केले आहे.

मुंबई - शहरात अमली पदार्थ तस्करांना हद्द पार करण्यासाठी अमली पदार्थ विरोधी पथकाने कंबर कसली असताना तस्करांनी आता अमली पदार्थांच्या डिलेव्हरीसाठी महिलांचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. नुकतीच केंद्रीय अमली पदार्थ विभागाच्या अधिकाऱ्यांनी आखाती देशात अमली पदार्थ नेणाऱ्या एका ४० वर्षीय सराईत महिलेला अटक केली आहे. मुलीला असलेल्या दुर्धर आजारासाठी पैसे नसल्यामुळे आरोपी शबाना बेगम (वय ४०) यांनी तब्बल १७ वेळा जीव धोक्यात घालून अमली पदार्थांची तस्करी केल्याचेे चौकशीत उघडकीस आले आहे.

मूळची हैद्राबादची रहिवाशी असलेल्या शबाना बेगम हिला १६ वर्षांची एक अल्पवयीन मुलगी आहे. कित्येक वर्षानंतर झालेल्या या मुलीवर ती जिवापाड प्रेम करायची. मात्र नियतीला त्या दोघींचे प्रेम मान्य नव्हते. मुलीच्या जन्मानंतरच मुलीला एका दुर्धर आजार असल्याचे शबानाच्या लक्षात आले. त्यासाठी लागणारा वैद्यकिय खर्चही तितकाच होता. मुलीच्या उज्वल भविष्यासाठी  कोणत्याही थराला जाण्याची तिची तयारी होती. अशातूनच ती अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांच्या संपर्कात आली. शबानाच्या मजबूरीचा फायदा घेऊन हे तस्करी तिला आखाती देशात अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी पाठवायचे. 

आखाती देशात आता थंडी पडण्यास सुरूवात होत असल्याने त्या ठिकाणी चरस या अमली पदार्थाला मोठी मागणी असते. भारताच्या तुलनेत तिकडे अमली पदार्थांसाठी मोेठ्या प्रमाणात पैसे मोजावे लागतात. मुलीला झालेल्या  आजारासाठी मोठ्या प्रमाणात पैसे उभे करायचे असल्यामुळे शबाना ही तस्करीसाठी तयारी झाली. आतापर्यंत ती १६ वेळा परदेशात अमली पदार्थांच्या तस्करीसाठी गेली होती. १७ व्या वेळी ती चरसच्या तस्करीसाठी हैद्राबादहून मुंबईला आली होती. मुंबईतून ती शारजा येथे आखाती देशात जाणार होती. मात्र याबाबत केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाला गुप्त माहिती मिळाल्यानंतर शनिवारी शबानाला अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली. तिच्याजवळून सुरक्षा अधिकाऱ्यांनी २.५ किलो चरस हस्तगत केले आहे. 

काही दिवसांपूर्वीत केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथक आणि मुंबई पोलिस अमली पदार्थ विरोधी पथकाने विमानतळाहून शेख फुरकाना खातून या महिलेला अटक केली होती. शबाना ही त्याच रॅकेटमधील असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थWomenमहिलाSmugglingतस्करी