शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

२८९ खात्यांमध्ये वळते केले साडेचौदा कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 06:31 IST

‘आयडीबीआय’वर संशयाची सुई

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहरातील शंकर नागरी सहकारी बँकेचे आयडीबीआय बँकेत असलेले खाते हॅक करून १४ कोटी ५० लाख रुपये काढण्यात आले होते. हे पैसे हॅकरने तब्बल २८९ खात्यांत वळवले आहेत. विशेष म्हणजे महिनाभरापूर्वीच शंकर नागरी बँकेने या ठिकाणी खाते उघडले होते.  

शंकर नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी आयडीबीआय बँकेवर आरोप केले आहेत. ते म्हणाले, आरटीजीएस करण्याची व्यवस्था सहकारी बँकेत नाही. त्यामुळे बँकेने ‘आयडीबीआय’मध्ये खाते उघडून तिथे रक्कम डिपॉझिट ठेवली होती. आमच्या या खात्यात १४ कोटी ५० लाख रुपये होते. काही दिवसांपूर्वी आम्हाला बँकेने रक्कम डिपॉझिट करण्यास सांगितले, त्यावेळी ही बाब उघडकीस आली. त्यात तब्बल २८९ अनोळखी खात्यांत ही रक्कम  वळविल्याचे लक्षात आले. त्यानंतर आयडीबीआयला कळविण्यात आले; परंतु, त्यांनी चालढकल केली. १७ डिसेंबरला या खात्यातून पहिल्यांदा अनोळखी व्यक्तीच्या खात्यात रक्कम पाठविण्यात आली. २ जानेवारीपर्यंत हा प्रकार सुरूच होता. आयडीबीआयला आम्ही अनेक वेळा ओटीपी आणि विवरण मागितले. परंतु, त्यासाठीही टाळाटाळ करण्यात आली, असा आरोप पोकर्णा यांनी केला. नेटबँकिंग सुरू करा म्हणून ८ डिसेंबर रोजीच बँकेला पत्र दिले होते. या सर्व प्रकाराला आयडीबीआय बँक जबाबदार आहे. याबाबत पोलीस आणि आरबीआयकडे तक्रार दिली आहे, असेही पोकर्णा म्हणाले.  दरम्यान, या संपूर्ण प्रकाराबाबत येथील आयडीबीआय बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, आमच्या बँकेकडून तपासणी तसेच चौकशीसाठी पथक येणार आहे. त्यानंतरच नेमका काय प्रकार झाला, ते पुढे येईल, असे सांगत कुठलीही प्रतिक्रिया द्यायला त्यांनी नकार दिला.

आयटी सेल करणार तपासणीn बँकेतील सायबर हल्ला प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई येथून आयटीचे पथक येणार आहे. n त्यानंतरच या प्रकरणाचा उलगडा होणार आहे. हे पथक नांदेडमध्ये आज, शुक्रवारी दाखल होण्याची शक्यता आहे. 

इतर चार बँकांमध्ये असाच प्रकारराज्यात इतर चार बँकांचे पैसेही आयडीबीआयच्या खात्यातून हॅकरने लंपास केले आहेत. त्यात ओझर मर्चंट, नाशिक, देवडा मर्चंट, नाशिक, धुळे विकास बँक आणि नगर शहर बँकेचा समावेश असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष पोकर्णा यांनी दिली. याबाबत पोलीस आणि आरबीआयकडे तक्रार दिली आहे, असेही पोकर्णा म्हणाले.  

टॅग्स :fraudधोकेबाजीBanking Sectorबँकिंग क्षेत्र