ओयो हॉटेलमध्ये वाहतूक पोलिसाला एक महिला मारहाण करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हरियाणाच्या फरिदाबादचा हा व्हिडीओ आहे. मारहाण करणारी महिला त्या ओयो हॉटेलची संचालिका आहे. आता नेमका काय प्रकार घडला ते आता समोर येत आहे.
व्हिडीओमध्ये हा वाहतूक पोलीस मारहाण करू नका असे सांगताना दिसत आहे. परंतू ही महिला त्याला मारहाण करत होती आणि तिच्या सोबत असलेल्यांना याचा व्हिडीओ काढा म्हणून सांगत होती. या प्रकरणात पोलिसांनी महिलेसह तिघांना अटक केली आहे.
प्रकरण असे आहे की, वाहतूक पोलिस अधिकारी दीपक यांना दयाल हॉस्पिटलच्या चौकात वाहतूक नियंत्रणाची ड्युटी मिळाली होती. तिथे त्यांना दुसऱ्या चौकात कोंडी झाल्याची माहिती मिळाली. म्हणून ते तिथे गेले होते. ओयो हॉटेलबाहेर काही गाड्या लागल्या होत्या. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. त्या गाड्या कोणाच्या आहेत हे त्याने बाहेरच उभ्या असलेल्या हॉटेलच्या संचालिका आणि तिच्यासोबतच्या अन्य दोघांना विचारले. तेव्हा त्यांनी या वाहतूक पोलिसालाच धरत हॉटेलमध्ये ओढून नेले.
आपल्याला विचारल्याच्या रागातून या संचालिकेने वाहतूक पोलिसालाच चप्पल काढून मारहाण सुरु केली. या प्रकरणात हॉटेल संचालिक रंजित कौर, सोनू आणि करण या तिघांना अटक करण्यात आली आहे.