शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पीडितेच्या मांडीला हात लावणे किंवा अश्लील कृत्य करणे म्हणजे बलात्कारच- केरळ हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 13:30 IST

Keral highcourt verdict: 2015 मध्ये आरोपीने एका अल्पवयीन मुलीच्या मांड्यांसोबत अश्लील कृत्य केलं होतं.

ठळक मुद्दे याप्रकरणी आरोपी आजीवन कारावासाची शिक्षा भोगत आहे.

नवी दिल्ली: पीडितेच्या मांडीला हात लावणे किंवा अश्लील कृत्य करणे म्हणजे बलात्कारच आहे, अशी स्पष्ट टिप्पणी केरळ हायकोर्टाने केली आहे. बलात्काराच्या एका प्रकरणाची सुनावणी करताना कोर्टाने म्हटले की, आरोपीने पीडितेच्या मांड्यावर हात लावला किंवा काही अश्लील कृत्य केले तर त्याला भारतीय दंड संहितेच्या कलम 375 नुसार, बलात्कारास जबाबदार धरले जाईल. 

जस्टिस के. विनोद चंद्रण आणि जस्टिस जियाद रहमान यांच्या खंडपिठाने हा निर्णय 2015 च्या एका बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान दिला. याप्रकरणात आजीवन कारावासाची शिक्षा भोगत असलेल्या आरोपीने 2015 मध्ये एका 11 वर्षीय मुलीवर लैंगित अत्याचार केला होता.

काय आहे घटना ?मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने आपल्या घराशेजारी राहणाऱ्या एका 11 वर्षीय मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्या मांड्यासोबत अश्लील चाळे केल होते. प्रकरणा वाढल्यानंतर पोलिसांनी आरोला ताब्यात घेतले. या प्रकरणाची कनिष्ठ न्यायालयात सुनावणी झाली आणि पॉक्‍सो अॅक्‍ट आणि अनैसर्गिक लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आरोपीला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

या शिक्षेविरोधात आरोपीने उच्च न्यायालयात अर्ज करुन मांड्यांना हात लावणे बलात्कार कसा होऊ शकतो, असा प्रश्न केला होता. आरोपीच्या वकीलाने कोर्टात युक्तीवाद करताना, मांड्यांसोबत अश्लील कृत्य करणे 375 अंतर्गत येऊ शकत नाही, असे म्हटले होते. त्यावर कोर्टाने वजाइना, यूरेथ्रा, एनस किंवा शरीराच्या इतर भागांना हात लावून छेडछाड केल्यास आयपीसी कलम 375 अंतर्गत बलात्कार ठरवून शिक्षा करता येते, असे सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKeralaकेरळCourtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालय