नालासोपारा : पश्चिमेकडील ३७ वर्षीय शिक्षिकेला आरोपीने लग्नाच्या भूलथापा देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. पीडितेने नालासोपारा पोलीस ठाण्यात मंगळवारी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.नालासोपारा पश्चिमेत ही पीडिता राहते. आरोपी युगान्त वाळिंजकर (३५) याने २०१६ ते २०१९ च्या दरम्यान तिला लग्नाच्या भूलथापा देऊन तिच्यावर अत्याचार केला. पीडितेचा मुलगा बुद्धिaबळ खेळण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी आरोपीकडे जात होता. तेथे दोघांची ओळख झाली व नंतर त्याचे प्रेमात रूपांतर झाले. वाळिंजकर याने तिला लग्नाचे वचनही दिले. मात्र, वर्षभरापासून आराेपीने तिला टाळण्यास सुरुवात केली व तिचा फोनही उचलत नव्हता. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने पाेलिसांत तक्रार दिली.
लग्नाच्या भूलथापा देऊन शिक्षिकेवर अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 01:56 IST