शहरं
Join us  
Trending Stories
1
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
2
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
3
'मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी', विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा दिवसभरासाठी बहिष्कार
4
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय? फक्त परतावा नका पाहू, 'या' १० गोष्टी तपासाच! अन्यथा पैसे जातील पाण्यात
5
'त्या' रात्री काय झालं? पतीला कसं मारलं? बॉयफ्रेंडसोबत पकडल्या गेलेल्या ९ मुलांच्या आईने 'असा' केला गुन्हा कबूल! 
6
कॉलर पकडली, फरफटत नेलं, बेदम मारलं; भाजपा नेत्याच्या समर्थकांची आयुक्तांना मारहाण
7
'आभाळमाया'तील चिंगीला असा मिळाला 'बाजीराव मस्तानी', सेटवर संजय भन्साळी चिडले तेव्हा...
8
फक्त एक फोन लीक झाला अन् 'या' देशाच्या पंतप्रधानांना पदावरून हटवलं; नेमकं काय घडलं?
9
कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! 'डीके शिवकुमार यांच्यासोबत १०० आमदार'; नेत्याच्या दाव्यामुळे हायकमांड बंगळुरुमध्ये पोहोचले
10
Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."
11
"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 
12
मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी
13
Sangareddy Pharma Company Blast: फॅक्ट्रीमध्ये ब्लास्ट, 'सिगाची'चा शेअर जोरदार आपटला; प्लांट बंद, उत्पादनावर मोठं संकट
14
"तो दहशतवाद नाही, त्यांचा संघर्ष", पाकिस्तानचे सैन्य प्रमुख मुनीर यांचे 'नापाक' बोल; भारताबद्दल काय म्हणाले?
15
IND vs ENG: जसप्रीत बुमराहला बाहेर बसवा, 'या' गोलंदाजाला संघात घ्या; अनुभवी ग्रेग चॅपल यांचा सल्ला
16
या जिल्ह्यात हार्ट अटॅकमुळे एका महिन्यात १८ तरुणांचा मृत्यू; सरकारने दिले चौकशीचे आदेश
17
Viral Video: पाळीव कुत्र्यासोबत सायकलवरून १२००० किमी प्रवास, तरुणाचा व्हिडीओ व्हायरल
18
४४० व्होल्टचा झटका! स्मार्ट मीटरच्या नावाने स्कॅम; ६८ लाखांचं बिल पाहून वृद्धाची बिघडली प्रकृती
19
प्रियकरानं सांगितलं म्हणून नवरा सोडला, आता बंद घरात मिळाला तरुणीचा मृतदेह; कसा झाला दुर्दैवी अंत?
20
आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन

चाकूचा धाक दाखवून पीडितेवर केली बळजबरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 21:04 IST

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देया प्रकरणी चेंबूर पोलिसांनी पंकज बाजीराव अहिरे याला अटक केली आहे.पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी पंकजला अटक केली आहे. दुसऱ्यांदा आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

मुंबई - बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगून आलेल्या ३६ वर्षीय आरोपीने तक्रारदार पीडितेवर चाकूच्या धाकावर पुन्हा बळजबरी केल्याचा प्रकार चेंबूर परिसरात पुढे आला आहे. या प्रकरणी चेंबूर पोलिसांनी पंकज बाजीराव अहिरे याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.चेंबूर येथील लाल डोंगर परिसरात राहणाऱ्या २४ वर्षीय पीडित तरुणीचे २०१२ मध्ये पंकजसोबत ओळख झाली होती. काही दिवसांनी दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. त्यावेळी लग्नाचे आमिष दाखवून पंकजने पीडित तरुणीशी शारिरीक संबध ठेवले होते. मात्र, तरुणीने लग्नासाठी तगादा लावल्यावर पंकजने तिला लग्नास नकार दिला. पंकजने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने त्याच्याविरोधात २०१३ मध्ये चुन्नाभट्टी पोलीस ठाण्यात बलात्कार आणि फसवणूकीचा गुन्हा नोंदवत पोलिसांनी त्याला अटक केली. या गुन्ह्यात पंकज कित्येक वर्ष तुरूंगात शिक्षा भोगत होता. तसेच दुसरीकडे तरुणी घडलेला प्रकार विसरून पुन्हा तिच्या आयुष्यात रमली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पंकज हा शिक्षा भोगून बाहेर आला होता. त्यावेळी त्याने पीडित तरुणीचा माग काढत ती कामाला असलेल्या ठिकाणी पोहचला.

कामावरून पीडित तरुणी घरी जात असताना मोबाइलवर मग्न असल्याचे पाहून पंकजने तिचा मोबाइल हिसकावला. त्यावेळी पंकजला पाहून पीडित तरुणी घाबरली. पंकजने पीडितेच्या मोबाइलवरून स्वत:ला मिसकॉल देत तिचा नंबर मिळवला. नंतर पंकज वारंवार पीडितेची समजूत काढत लग्न करण्यासाठी पीडितेच्या मागे लागला. मात्र, पीडित तरुणीचा नकार कायम होता. तरुणीच्या या स्वभावाला कंटाळून पंकजने २५ नोव्हेंबर रोजी पीडित तरुणी काम करत असलेल्या कुर्ला येथील पतपेढीजवळ तिला गाठले. त्यानंतर त्याने चाकूच्या धाकावर पीडितेला सोबत येण्यास भाग पाडले. पीडितेला घेऊन पंकज त्याच्या आरसीएफ कॉलनीत राहत्या घरी घेऊन आला. त्यावेळी त्याने तरुणीवर पुन्हा चाकु दाखवून अत्याचार करत तिला मारहाण केली. तसेच लग्नासाठी तयार न झाल्यास परिणाम वाईट होतील असे ही धमकावले. दरम्यान, पंकज बाथरूममध्ये शौचास गेल्याची संधी साधून तरुणीने कशीबशी पंकजच्या तावडीतून सुटका करून घेत घर गाठले. हा घडलेला प्रकार तिने घरातल्यांना सांगितल्यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी चेंबूर पोलिसात तक्रार दाखल केली. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी पंकजला अटक केली आहे. दुसऱ्यांदा आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसRapeबलात्कारMumbaiमुंबईfraudधोकेबाजी