शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांनी '102 डिग्री' ताप असतानाही संसदेत 'मत चोरी'वर दिलं उत्तर, सभागृह सोडून गेले राहुल गांधी
2
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आता अण्णा हजारे मैदानात; विचारणा करत म्हणाले, “कुंभमेळा...”
3
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
4
SDM नां केली मारहाण, ४ गर्लफ्रेंड, त्यापैकी ३ प्रेग्नंट, बोगस IAS चा प्रताप, कोण आहे तो?  
5
देवेंद्र फडणवीसांनी 'पांघरूण खातं' सुरु करावं आणि त्याचं मंत्री व्हावं- उद्धव ठाकरे
6
दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिदला दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर
7
उत्तर प्रदेशसह या ६ राज्यांमध्ये SIR साठीची मुदत वाढवली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय  
8
"रोहित शर्मा मैदानात जेव्हा 'तसा' वागतो, ते खूप विचित्र वाटतं"; यशस्वी जैस्वाल अखेर बोललाच
9
“प्राचीन मंदिर पाडून RSSचे कार्यालय”; उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, ‘तो’ फोटोही दाखवला
10
अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, सशक्त लोकायुक्तावरून राज्य सरकारला दिला असा इशारा...  
11
थंडीत फ्रीज बंद करणं पडू शकतं महागात; वीज वाचवण्याच्या नादात करू नका 'ही' चूक
12
Technology: सावधान! तुमच्या फोन स्क्रीनवरील 'हे' तीन रंगीत ठिपके देतात हॅकिंगची सूचना
13
"बिबट्यांना पाळीव प्राण्यांचा दर्जा द्या", आमदार रवी राणा यांची अजब मागणी 
14
उंदीर मारण्याचं औषध, सल्फास, तुटलेला मोबाईल...; नवरदेवाचा संशयास्पद मृत्यू, आज होतं लग्न
15
टाटा-महिंद्रासह 'या' शेअर्समध्ये जोरदार तेजी! सलग ३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; फक्त एका क्षेत्रात तोटा
16
लेकीचं भविष्य 'सेफ' करण्यासाठी करा 'या' ६ ठिकाणी गुंतवणूक! मिळवा सर्वाधिक परतावा आणि टॅक्समध्ये सूट
17
फ्रान्समध्ये अचानक वीज झाली 'मोफत', सरकारकडून नागरिकांना 'शून्य दरात' पुरवठा
18
पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी देवेंद्र फडणवीस होणार?; CM म्हणाले, “बाप जिवंत असताना...”
19
इंडिगोचा मोठा निर्णय! त्रस्त प्रवाशांना नुकसानभरपाई; मिळणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर
20
Electric Geyser Safety Tips: तुम्ही Geyser वापरता? मग 'या' ३ गोष्टींची काळजी घ्या, अपघात टळेल!
Daily Top 2Weekly Top 5

टाेरेस घाेटाळा: ख्रिसमसच्या बहाण्याने संस्थापक परदेशात पसार; 'त्या' पत्राची चौकशी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 06:33 IST

सीए अभिषेक गुप्ता संरक्षणासाठी कोर्टात

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : टोरेसच्या मुख्य संस्थापकांपैकी एक ओलेना स्टोएना ही युक्रेनी महिला आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर आली असून, तिचा शोध सुरू करण्यात आला आहे. तसेच संस्थापक व्हिक्टोरिया कोवालेंकोसह अन्य पदाधिकारी ख्रिसमसचा बहाणा करत डिसेंबरअखेरीस देशाबाहेर पसार झाल्याचे चौकशीत समोर येत आहे. दरम्यान, शिवाजी पार्क पोलिसांनी सहा महिन्यांपूर्वी टोरेसला पाठविलेल्या पत्रानंतर पुढे काय झाले, चौकशीला ब्रेक का लागला, याचा तपास एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आला आहे. 

टोरेस प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेची छापेमारी सुरू असून आतापर्यंत तीन हजारांच्या आसपास खडे आणि पाच कोटी रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहेत. जयपूरसह भारतातील लोकल मार्केटमधून टोरेसचे संस्थापक खडे खरेदी करत होते. त्याचबरोबर सर्टिफिकेट कार्ड दिले जात असल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास बसला होता. या प्रकरणी अटकेत असलेली तानिया कासातोवा आणि व्हॅलेंटिना गणेशकुमार या दोघी संस्थापकांसाठी दुभाषक म्हणून काम करत असून, घोटाळ्याशी काही संबंध नसल्याचे सांगत आहेत. तानियाच्या घरातून ७७ लाखांची रोकड जप्त करण्यात आली असल्याने या दोघींचा कटात सहभागाचा पोलिसांना संशय आहे. 

ओलेना स्टोएनाने राजीनामा दिल्यानंतर व्हिक्टोरिया संस्थापक झाली. ओलेनाविरोधात नवी मुंबई आणि मीरा रोड पोलिसांत गुन्हा दाखल असून प्रमुख संशयितांपैकी ती एक आहे. ख्रिसमसच्या बहाण्याने तिने व्हिक्टोरियासोबत पलायन केल्याचे समजते.

दहावी नापास सीईओ

दहावी नापास असलेला तौफिक ऊर्फ रियाझ कार्टर हा टोसेरचा सीईओ होता. संचालक असलेल्या सर्वेश सुर्वेचा मित्र असलेल्या तौफिकचा शोध सुरू आहे. तो भायखळ्यात आधार कार्डही बनवत होता. त्यामुळेच त्याला यात सहभागी करून घेतल्याचे समोर येत आहे.

मीरा रोडमध्ये तिघांना अटक

मीरा रोडच्या रामदेव पार्क भागातील टोरेस ज्वेलरी फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर नवघर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. रामदेव पार्कच्या अनंता एक्झोरिया इमारतीत भाड्याने टोरेस ज्वेलरी शोरूम उघडण्यात आले होते. या फसवणूक प्रकरणी सोमवारी पोलिसांनी तपास सुरू केला.  कंपनीची बँक खाती व त्यातील ९ कोटी २४ लाखांची रक्कम गोठवण्यात आली. गुरुवारी पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक धीरज कोळी आदींनी शोरूमची पाहणी  केली होती.  

टोरेस शोरूमची जागा ज्या तरुणीच्या नावाने भाड्याने घेण्यात आली होती, त्या लक्ष्मी सुरेश यादव (वय २३) हिला ताडदेव येथून अटक केली आहे. शाखेचा व्यवस्थापक नितीन लखवानी (वय ४७, रा. मालाड पश्चिम) आणि रोखपाल मोहम्मद मोईजुद्दीन खालिद शेख (वय ५०, रा. मीरा रोड) यांना अटक केली आहे. 

२६ लाख रुपयांची रोकड जप्त

पोलिसांनी लखवानी व शेख या दोघांकडून २६ लाख २० हजारांची रक्कम हस्तगत केली आहे. तक्रारदारांची संख्या ७६ झाली असून फसवणुकीची रक्कम १ कोटी ७ लाख रुपयांपर्यंत गेली आहे. फसवणूक झालेले लोक जसे येतात, तशा त्यांच्या तक्रारी घेतल्या जात आहे, असे उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक संदीप व्हस्कोटी हे तपास करत आहेत. मीरा रोडच्या शाखेमार्फत  आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त फसगत झालेले लोक समोर आले आहेत. 

कॉन्फरन्स रूममधील भांडणाने गुंतवणूकदार सतर्क

  • कंपनीचे भारतीय पदाधिकारी आणि कर्मचारी यांच्यात कॉन्फरन्स रूममध्ये ५ जानेवारी रोजी भांडण झाले. ३० तारखेला गुंतवणूकदारांचा हप्ता थकला. १ तारखेचा कर्मचाऱ्यांचा पगार मिळाला नाही. 
  • दुसरीकडे, अभिषेक गुप्ताने पाठवलेल्या मेलमधून होत असलेले आरोप खोटे आहेत का, फसवणूक होत आहे यावरून वाद झाले. एकमेकांना ईमेल केले. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांनी गुंतवणूकदारांना गडबड झाल्याचे सांगून टोरेस कार्यालयाबाहेर बोलावून घेतले. 
  • सर्वजण शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गेले आणि घोटाळ्याचे बिंग फुटल्याची माहिती तपासात समोर आली. दरम्यान, अभिषेक गुप्ताची चौकशी सुरू आहे.

अभिषेक गुप्ता संरक्षणासाठी कोर्टात

  • जवळपास सव्वालाख गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या टोरेस कंपनीचे सीए अभिषेक गुप्ता यांनी पोलिस संरक्षणासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने गुप्ता यांना आर्थिक गुन्हे शाखेला पक्षकार करण्याची सूचना केली.
  • आपण टोरेस कंपनीतील गैरव्यवहार बाहेर काढला आहे. आपण तक्रारींचे मेल सर्व तपास यंत्रणांना पाठवले होते. गैरव्यवहार सुरू असल्याचे ऑक्टोबरमध्येच सांगितले होते. त्यामुळे आपल्या जीवाला धोका आहे.
  • गैरव्यवहाराचे आपण साक्षीदार आहोत, असे सांगत गुप्ता यांनी पोलिस संरक्षणसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
टॅग्स :torres scamटोरेस घोटाळाPoliceपोलिसmira roadमीरा रोडChristmasनाताळ