शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
2
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
3
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
4
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
5
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
6
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
7
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
8
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
9
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
10
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
11
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
12
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
13
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
14
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
15
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
16
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
17
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
18
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
19
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
20
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?

प्रसाद लाड यांच्या घराबाहेर चोरीचा ऐवज; सापडल्या नाणी, दागिने, देवाच्या मूर्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 06:05 IST

चोरट्यानं सामान टाकून काढला पळ...

मुंबई :  भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या माटुंगा येथील निवासस्थानाबाहेर रविवारी पहाटे पैसे, दागिन्यांची बॅग सापडल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी ही बॅग उघडून बघितली असता त्यात चलनी नाणी, दागिने आणि देवाच्या मूर्ती इत्यादी ऐवज आढळला. हे साहित्य शेजारील इमारतीतील घरातून चोरी केल्याचे समोर आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे आमदार लाड यांच्या घराच्या सुरक्षारक्षकांना ही बॅग दिसली. त्यांनी लाड यांना फोन करून बॅगेची माहिती दिली. लाड यांनी याबाबत पोलिसांना कळवताच, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांना बॅगेत तीन वेगवेगळ्या बॅग होत्या. पोलिसांनी या बॅग उघडून बघितल्या असता त्यात नाणी, सोने, चांदीच्या मूर्ती असा ऐवज होता. 

माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजारील इमारतीमधील एका घरातून हा ऐवज चोरी करण्यात आला आहे. घराच्या बाथरूममधून आत प्रवेश करून त्याने देवघरातील सामानाची चोरी केली. इमारतीत सध्या कोणी राहण्यास नाही. तसेच सीसीटीव्हीही नाही.  प्रसाद लाड यांच्या घराबाहेरील सीसीटीव्हीमध्ये देखील काहीही दिसून आलेले नाही.

म्हणून चोरट्याने बॅग टाकून काढला पळ आमदार लाड यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत, सकाळी सुरक्षारक्षकाने कॉल करून घराबाहेर बॅग असल्याची माहिती दिली.  घराबाहेर २४ तास पोलीस संरक्षण असते. पोलिसांना संशयित व्यक्ती दिसल्याने त्यांनी हटकले असता त्याने बॅग टाकून पळ काढला असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Prasad Ladप्रसाद लाडCrime Newsगुन्हेगारी