शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

धाक दाखवून लुटणाऱ्यांना तासाभरात बेड्या ! ;बीड पोलिसांची सतर्कता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 16:04 IST

गावाकडे निघालेल्या दुचाकीस्वारांना रस्त्यात अडवून वस्तऱ्याचा धाक दाखवून त्यांच्याजवळील रोख रक्कम व मोबाईल घेऊन चौघे जण पसार झाले. दुचाकीस्वारांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. 

बीड : गावाकडे निघालेल्या दुचाकीस्वारांना रस्त्यात अडवून वस्तऱ्याचा धाक दाखवून त्यांच्याजवळील रोख रक्कम व मोबाईल घेऊन चौघे जण पसार झाले. दुचाकीस्वारांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. 

पोलिसांनीही तात्काळ सापळा लावून अवघ्या तासाभरातच चारही लुटारूंना बेड्या ठोकल्या. शनिवारी रात्री १२ वाजता बायपास रोडवर ही घटना घडली होती. दरम्यान, बीड ग्रामीण ठाण्यात आणल्यानंतर या चारही आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यात ते अयशस्वी ठरले.

सचिन विश्वनाथ पाटोळे, सचिन हिरामन गायकवाड, किरण मोहन कसबे, नितीन संजय भालेराव [सर्व रा. रमाई चौक, खंडेश्वरी रोड, बीड] अशी आरोपींची नावे आहेत. अक्षय राऊत [रा. नांदलगाव, ता. गेवराई] हा बीडमध्ये एका किराणा दुकानावर काम करतो. शनिवारी पगार झाल्यानंतर आपल्या मित्रासह तो गावाकडे निघाला. बीड बायपासवर त्याला चौघांनी अडविले. वस्तऱ्याचा धाक दाखवून त्यांच्याजवळील रोख १० हजार रुपये व मोबाईल घेऊन ते पसार झाले. त्यानंतर राऊत याने तात्काळ शहर पोलीस ठाणे गाठले. 

त्यानंतर पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान, पेठबीडचे पो. नि. बी. एस. बडे यांनी तात्काळ चक्रे फिरवली. अवघ्या तासाभरात त्यांनी चारही आरोपींना बेड्या ठोकल्या. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, उप अधीक्षक सुधीर खिरडकर, गुन्हे शाखेचे पो. नि. घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. बडे, सुलेमान, स.पो.नि. गजानन जाधव, दिलीप तेजनकर, शीतलकुमार बल्लाळ, पी. एस. साळवे, एस. यू. अलगट, के. आर. जाधव, एल. आर. राठोड, आर. ए. पाईकराव, साजेद पठाण, नसीर शेख, अंकुश महाजन, बीड ग्रामीण, बीड शहर, पेठ बीड व गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथक यांनी केली.

दुचाकीच्या क्रमांकावरुन शोधरक्कम घेऊन पसार होताना अक्षयने चोरट्यांच्या दुचाकीचा नंबर लक्षात ठेवला. तोच पोलिसांना दिला. त्यामुळे पोलिसांना तपास कामात मदत झाली.

ठाण्यात पलायनाचा प्रयत्नचारही आरोपींना पकडून बीड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले. ठाण्यात आणल्यानंतर या चौघांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तिघे ठाण्याच्या परिसरात ताब्यात घेतले. परंतु नितीन भालेराव हा बुंदेलपुरा भागात पळाला. येथे एका नालीत पाय अडकून पडल्याने तो पोलिसांच्या हाती लागला. पाठलाग करताना स.पो.नि. शीतलकुमार बल्लाळ हे सुध्दा किरकोळ जखमी झाले. या चौघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटकBeed policeबीड पोलीस