शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘तपोवन’वर दगड फेकणारा अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 00:19 IST

आंबिवली स्थानकानजीक रेल्वे फाटकाजवळ तपोवन एक्स्प्रेसवर दगडफेक करणाऱ्या दोघांपैकी एकाला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी शुक्रवारी पहाटे पुणे येथून अटक केली.

डोंबिवली - आंबिवली स्थानकानजीक रेल्वे फाटकाजवळ तपोवन एक्स्प्रेसवर दगडफेक करणाऱ्या दोघांपैकी एकाला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी शुक्रवारी पहाटे पुणे येथून अटक केली. तर दुस-या आरोपीचा अद्याप शोध सुरू आहे. दरम्यान, अटकेतील आरोपी अल्पवयीन आहे का, याचा तपास करण्याचे आदेश कल्याण रेल्वे न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आरोपीची रवानगी भिवंडीतील बालसुधारगृहात केल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित बारटक्के यांनी दिली.तपोवन एक्स्प्रेसवर दोघे जण दगडफेक करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याआधारे दोघा अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करून लोहमार्ग पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला होता. त्यासाठी दोन पथकही स्थापन केली होती. तपासाधिकारी पंढरीनाथ भोसले यांच्याकडे त्याची जबाबदारी आहे. मात्र, एका आरोपीला पुणे येथून ताब्यात घेतले आहे. तर, दुस-याचा शोध सुरू असल्याचे बारटक्के यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, अटक आरोपी आंबिवलीतील इराणी वस्तीमधील रहिवासी आहे. त्याच्या शाळेच्या दाखल्यानुसार तो अल्पवयीन नाही. परंतु, आधारकार्डवरील जन्मतारखेनुसार तो अल्पवयीन आहे. त्यामुळे त्याबाबतच्या चौकशीचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.दुचाकी वडिलांच्या नावेएक्स्प्रेसवर दगडफेक केल्यानंतर दोन्ही आरोपी दोन दुचाकीवरून पसार झाले होते. पोलिसांनी या दोन्ही दुचाकी जप्त केल्या आहेत. त्यातील एक दुचाकी अटक केलेल्या आरोपीच्या वडिलांच्या नावे असल्याचेही स्पष्ट झाले आहे. दुसरा आरोपी लवकरच सापडेल, असा विश्वास बारटक्के यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी