शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

थरारक! निवृत्त पोलीसाने झाडल्या स्वतःच्या दोन मुलांवर गोळ्या; ऐरोलीतली घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 20:17 IST

Firing Case : ऐरोली सेक्टर 3 येथे सोमवारी संध्याकाळच्या सुमारास हि घटना घडली.

ठळक मुद्देपित्याचे नाव आहे. त्यांनी वसई येथे राहणाऱ्या स्वतःच्या मोठ्या मुलाला काही कामानिमित्त घरी बोलावून घेतले होते. भगवान हे निवृत्त पोलीस अधिकारी असल्याने त्यांच्याकडे परवाना असलेले पिस्तूल आहे.

नवी मुंबई - निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने  स्वतःच्या दोन मुलांवर गोळीबार केल्याची घटना सोमवारी ऐरोली येथे घडली. यामध्ये एकाची प्रकृती चिंताजनक असून दुसऱ्याला गोळी घासून गेली आहे. घटनेनंतर रबाळे पोलीसांनी वडिलाला पिस्तूलसह ताब्यात घेतले आहे. ऐरोली सेक्टर 3 येथे सोमवारी संध्याकाळच्या सुमारास हि घटना घडली. निवृत्त सहायक उपनिरीक्षक भगवान पाटील असे गोळीबार करणाऱ्या

पित्याचे नाव आहे. त्यांनी वसई येथे राहणाऱ्या स्वतःच्या मोठ्या मुलाला काही कामानिमित्त घरी बोलावून घेतले होते. त्यानुसार मोठा मुलगा विजय हा घरी आला असता लहान मुलगा सुजय हा देखील घरात होता. यावेळी  भगवान पाटील यांनी स्वतःकडील पिस्तूल मधून दोन्ही मुलांवर गोळ्या झाडल्या. त्यामध्ये विजयच्या पोटात एक गोळी घुसली असून दुसरी गोळी खांद्यातून आरपार गेली आहे. तर सुजय याच्या पोटाला गोळी घासून गेली असल्याने तो जखमी झाला आहे.

भगवान हे निवृत्त पोलीस अधिकारी असल्याने त्यांच्याकडे परवाना असलेले पिस्तूल आहे. याच पिस्तूल मधून त्यांनी स्वतःच्या दोन्ही मुलांवर गोळीबार केला. त्यात मोठा मुलगा विजय याची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच रबाळे पोलीसांनी भगवान पाटील यांना राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. शिवाय गुन्ह्यासाठी वापरलेले पिस्तूल देखील जप्त केले आहे. परंतु त्यांनी कोणत्या कारणाने गोळीबार केला याची चौकशी पोलीस करत आहेत.

टॅग्स :FiringगोळीबारNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिसArrestअटक