शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सिंहगड रस्त्यावर थरार! अल्पवयीन मुलाला गोळ्या झाडून मारण्याचा प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 22:51 IST

गोळ्या दुसरीकडे फायर झाल्याने तो अल्पवयीन मुलगा बचावला आहे.

लोकमत न्युज नेटवर्क धायरी: सिंहगड रस्ता परिसरात एका अल्पवयीन मुलावर गोळ्या झाडून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुदैवाने गोळ्या दुसरीकडे फायर झाल्याने तो अल्पवयीन मुलगा थोडक्यात बचावला आहे. हि घटना शनिवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास अभिरुची मॉलजवळ असलेल्या एका राजकीय पदाधिकाऱ्यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ घडली. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सिंहगड रस्ता परिसरातील एका राजकीय पदाधिकाऱ्यांच्या जनसंपर्क  कार्यालयाबाहेर दोन अल्पवयीन मुले बसली होती. दरम्यान सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तीन तरूणांनी तिथे येऊन यातील एका अल्पवयीन मुलावर गोळ्या झाडल्या. सुदैवाने त्या अल्पवयीन मुलाने मान खाली केल्याने हल्लेखोरांचा नेम चुकला. त्यांनतर ते हल्लेखोर तिथून पसार झाल्याची माहिती त्या अल्पवयीन मुलाने पोलिसांना सांगितली आहेघटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविण पाटील,पोलीस उपायुक्त संभाजी कदम, अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सातव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण जाधव आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून तपासाबाबत सूचना केल्या. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत. 

खरंच फायरिंग झाले का याबाबत साशंकता...अल्पवयीन तक्रारदार मुलाने पोलिसांना दिलेली माहिती तसेच घटनास्थळी आरोपींनी गावठी पिस्टलमधून गोळी झाडल्यानंतर पडणारी पुंगळी अद्यापपर्यंत आढळून आली नसल्याने खरंच फायरिंग झाली आहे का, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. याबाबत एका पोलीस अधिकाऱ्यांना लोकमत प्रतिनिधी ने माहिती विचारल्यानंतर तपास केल्यानंतरच काय ते समजेल, असे सांगण्यात आले. 

टॅग्स :FiringगोळीबारCrime Newsगुन्हेगारी