शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मॉलच्या गेमिंग मशीनमध्ये अडकला चिमुकलीचा हात, ३ बोटे कापली गेली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 10:52 IST

या घटनेनंतर पीडित मुलीच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. मॉलमध्ये सुरक्षा व्यवस्थेच्या हलगर्जीपणामुळे आणि व्यवस्थापनाच्या कमतरतेमुळे आमच्या मुलीच्या हाताची ३ बोटे कापल्याचा आरोप लावला आहे.

मोठमोठ्या मॉलमध्ये सध्या लहान मुलांच्या विविध गेम्सचं आकर्षण असते. मात्र हैदराबाद इथं घडलेल्या प्रकाराने पालकांना मोठा धक्का बसला आहे. याठिकाणी प्रसिद्ध मॉलमध्ये एका ३ वर्षीय मुलीच्या हाताची ३ बोटे कापली गेली. ही मुलगी गेमिंग झोनमध्ये गेम खेळत होती. बंजारा हिल्स रोडवरील या मॉलच्या चौथ्या मजल्यावर लहान मुलांसाठी गेमिंग झोन आहे. येथे गेम खेळण्यासाठी असलेल्या एका मशिनमध्ये लहान मुलीचा हात अडकला आणि काही सेकंदातच तिच्या हाताची ३ बोटे कापली. शनिवारी दुपारी ही दुर्घटना घडली. या घटनेने पालकांमध्ये दहशत पसरली आहे. 

या घटनेनंतर पीडित मुलीच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. मॉलमध्ये सुरक्षा व्यवस्थेच्या हलगर्जीपणामुळे आणि व्यवस्थापनाच्या कमतरतेमुळे आमच्या मुलीच्या हाताची ३ बोटे कापली. या मुलीचे नाव मेहविश लुबना असे आहे. शनिवारी दुपारी पालक त्यांच्या ३ मुलांसह एका मॉलमध्ये गेले होते. 

लुबना आणि इतर मुलांना घेऊन आई चौथ्या मजल्यावरील गेमिंग झोन क्षेत्रात गेली. ज्याठिकाणी लुबना गेम खेळत होती तेव्हा गेमिंग मशीनचा मागील दरवाजा उघडाच होता. मशीनला पकडून ती गेम खेळत होती. त्यावेळी अचानक मशीनचा दरवाजा बंद झाला. तिचा हात मशिनच्या दरवाजात अडकला. मशीनमधील तांत्रिक बिघाडामुळे दरवाजा उघडून ठेवला होता असं व्यवस्थापनाने सांगितले. मात्र यामुळे एका चिमुकलीच्या हाताची बोटे कापली गेली. 

मॉल व्यवस्थापक आणि गेमिंग झोनमधील कर्मचाऱ्यांवर आरोपदुर्घटनेनंतर या मुलीला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेले. तिथे मुलीच्या हाताची बोटे पुन्हा लावण्यात आली. घटनेच्यावेळी कुणीही कर्मचारी तिथे उपस्थित नव्हता. गेमिंग झोनमध्ये सीसीटीव्ही नसल्याचे व्यवस्थापकाने सांगितले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.