शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’ करत कारखाना लुटला, रिक्षाचालकासह तीन महिलांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 03:14 IST

कचरा वेचण्याच्या बहाण्याने हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये ‘रेकी’ करून एक कारखाना लुटणाऱ्या टोळीला वनराई पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

- गौरी टेंबकर-कलगुटकरमुंबई : कचरा वेचण्याच्या बहाण्याने हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये ‘रेकी’ करून एक कारखाना लुटणाऱ्या टोळीला वनराई पोलिसांनी मंगळवारी अटक केली. यात एका रिक्षाचालकासह तीन महिलांचा समावेश असून त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम उपनगरात धुमाकूळ घातला होता.नेरुल हसन (४२), राधेमां कवंडर (५५), शांती देवेंद्र (४२) आणि पल्लीमा देवेंद्र (४०) अशी अटक करण्यात आलेल्या टोळीतील सदस्यांची नावे आहेत. हे सर्व जुहूच्या नेहरूनगर परिसरातील रहिवासी आहेत. हसन हा रिक्षाचालक तर उर्वरित महिला या कचरा वेचण्याचे काम करतात.दोन आठवड्यांपूर्वी गोरेगावच्या सोनावाला मार्गावर लाइटचे बल्ब, ट्यूब बनविणाºया कारखान्यात चोरी करण्यात आली होती. यात लाखो रुपयांचे अ‍ॅल्युमिनियम, डायमेकिंग मशीन, तसेच अनेक महागड्या वस्तू लंपास करण्यात आल्या होत्या. या प्रकरणी कारखाना मालकाने वनराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.वनराई पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक राणी पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. त्यांनी सीसीटीव्ही पडताळणी केली तेव्हा दिंडोशी परिसरातदेखील अशाच प्रकारे चोरी करण्यात आल्याचे त्यांना समजले. दरम्यान, संशयित महिला या जुहूच्या नेहरूनगर परिसरात राहात असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे यांना मिळाली. त्यानुसार हसनसह तिन्ही महिलांना वनराई पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार या चौघांना अटक करण्यात आली आहे. वनराईसह दिंडोशी, जुहू, अंधेरी, डी.एन. नगरमध्येही त्यांनी असे प्रकार केल्याचे उघड झाले असून, या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई