शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
2
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
3
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
4
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
5
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
6
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
7
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
8
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय
9
IND W vs AUS W Semi Final Live:हीच ती वेळ! कांगारूंची शिकार करत टीम इंडियाच्या वाघीणीं फायनल गाठणार?
10
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
11
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
12
"माझ्या मुलीचं काय होईल?" जावयाने पाठवली घटस्फोटाची नोटीस, वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
अमेरिकेतील Rate Cut चा परिणामच नाही... उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण; 'हे' स्टॉक्स आपटले
14
मिथुन चक्रवतींच्या सुनेसोबत साऊथ इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचचा प्रकार, म्हणाली- "१७ वर्षांची असताना..."
15
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
16
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
17
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
18
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
19
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
20
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू

तीन हजार गुंतवणूकदारांची मनीएज ग्रुपद्वारे फसवणूक, आर्थिक गुन्हे शाखेकडून दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 09:54 IST

आर्थिक गुन्हे शाखेने दोघांना अटक करत दहा बँक खाते गोठवले आहे. 

मुंबई : मनीएज ग्रुपद्वारे नागरिकांना जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून १०० कोटींना फसवल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मनीएज ग्रुपसह दोन पतसंस्थेच्या अध्यक्षांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवत तपास सुरु केला आहे. यामध्ये जवळपास तीन हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा संशय आहे. आर्थिक गुन्हे शाखेने दोघांना अटक करत दहा बँक खाते गोठवले आहे. 

मालाडचा रहिवासी असलेला राहुल पोद्दार (३८) याच्या तक्रारीवरून मुलुंड पोलिस ठाण्यात राजीव जाधव, हरिप्रसाद वेणुगोपा, प्रणव रावराणे, प्रिया प्रभू व इतर मनीएज ग्रुप ऑफ कंपनीमधील संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. यापैकी हरिदास आणि प्रणव रावराणे याला अटक झाली आहे. तक्रारीनुसार, आरोपींनी २०१३ पासून मनीएज ग्रुप ऑफ कंपनीमध्ये विविध कंपनी स्थापन करून तसेच मुद्रा क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड व जीवन मल्टी-स्टेट मल्टी-पर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड स्थापन केल्या. त्यापैकी मनीएज इनव्हेसमेंट, मनीएज फिनकॉर्प, मनीएज रियल्टर्स आणि मनीएज कॅपिटल सर्व्हिसेस् या कंपनींकडे परवाना नसताना चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते.

आमिषाला बळी पडून पोद्दार यांच्यासह त्यांची पत्नी, आई, वडील, बहीण, सासू, जवळचे नातेवाईक, मित्रांनी गुंतवणूक केली. जानेवारी २०२२ ते मे २०२४ या काळात २ कोटी ८० लाख ८० हजार ७५० रुपये गुंतवले. त्यांच्या प्रमाणेच जवळपास ३००० हून अधिक गुंतवणूकदारांनी १०० कोटीहून अधिक रक्कम गुंतविल्याचा संशयही वर्तविण्यात आला आहे. आतापर्यंत १०० गुंतवणूकदार पुढे आले असून, फसवणुकीचा आकडा २८ कोटींवर गेला आहे. याचे कार्यालय मुलुंडमध्ये असल्याने मुलुंड पोलिसांनी गुन्हा नोंदवत, पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे हा गुन्हा वर्ग केला आहे. 

गुंतवणुकीवर वर्षाला २४ टक्के परतावा गुंतवणुकीवर वर्षाला २४  टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. त्यानुसार, तक्रारदाराने २०२२ मध्ये गुंतवणूक केली. गेल्यावर्षी मे महिन्यापासून परतावा मिळणे बंद झाल्याने त्यांनी ऑक्टोबर महिन्यात गुन्हे शाखेकडे धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, चौकशीअंती गुन्हा नोंदवत कारवाई केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी