शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

किराणा व्यापाऱ्यावर गोळीबार करणाऱ्यासह तीन दरोडेखोर जेरबंद, दोन रिव्हॉल्व्हरसह रोकड जप्त

By जितेंद्र कालेकर | Updated: January 10, 2023 22:03 IST

या कारवाईत दोन रिव्हॉल्व्हर, दोन जिवंत काडतुसे, मोटारकार आणि रोकड असा एक लाख ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ठाणे : एका घरफोडीतील आरोपीला जेरबंद केल्यानंतर वर्षभरापूर्वी किराणा मालाच्या व्यापाऱ्यावर गोळीबार करून खूनाचा प्रयत्न करणाऱ्या रफीक शेख उर्फ रफीक बाटला (४०, रा. राबोडी, ठाणे) याच्यासह तिघांना अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त गणेश गावडे यांनी मंगळवारी दिली. त्यांच्याकडून दोन रिव्हॉल्व्हर, दोन जिवंत काडतुसे, मोटारकार आणि रोकड असा एक लाख ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ठाण्यातील राबोडी भागात ५ जानेवारी २०२३ रोजी एक चोरीचा गुन्हा घडला होता. याच गुन्हयात सहायक पोलिस आयुक्त सोनाली ढोले आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष घाटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राजेंद्र गुजर, सहायक पोलिस निरीक्षक योगेश घोंगडे आणि उपनिरीक्षक दीपक पाटील आदींच्या पथकाने रफीक शेख आणि रमेश कुंवर (३३, रिक्षा चालक, रा. ठाणे) या दोघांना ७ जानेवारी रोजी अटक केली होती. यातील रफीकच्या  घरझडतीमध्ये पोलिस पथकाला दोन रिव्हाल्व्हर आणि दोन जिवंत काडतुसे मिळाली. त्यावेळी घाटेकर यांच्या पथकाने केलेल्या सखोल चौकशीमध्ये ५ फेब्रुवारी २०२२ रोजी राजेंद्र आणि रमेश यांनी याच भागातील किराणा व्यापाऱ्यावर गोळीबार केल्याची कबूली दिली.

या हल्ल्यात त्याच्या पोटाला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला होता. उपचारानंतर तो या हल्ल्यातून बचावला होता. या हल्ल्यानंतर रफीकसह तिघेजण पळून गेले होते. ११ महिन्यांनी एका घरफोडीच्या तपासात आधीच्या खूनाचा प्रयत्नाचाही गुन्हा उघड झाल्याने त्यांचा तिसरा साथीदार अंजूम शेख (४०, रा. पहिली राबोडी, ठाणे) यालाही ९ जानेवारी २०२३ रोजी पोलिसांनी अटक केली. गोळीबाराच्या ठिकाणी मिळालेले काडतुस आणि वर्षभराने रफीकच्या घरात मिळालेले जिवंत काडतुसे दोन्ही एकच असल्याचेही तपासात समोर आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना बोलते केल्यानंतर या गुन्हयाची उकल झाल्याची माहिती उपायुक्त गावडे यांनी दिली. यातील तिन्ही आरोपींना सहा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस