शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पबजीच्या वेडानं जीव घेतला; आवाज कमी करण्यास सांगितल्यानं तिघांकडून एकाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2020 15:55 IST

पबजी खेळताना आवाज कमी करण्यास सांगितल्यानं तरुण संतापले

जम्मू: पबजी गेमची लोकप्रियता दिवसागणिक वाढत आहे. या गेमनं तरुणांना अक्षरश: वेड लागलं आहे. अनेक जण तासनतास पबजी खेळत असतात. याच पबजीच्या वेडानं एका व्यक्तीचा जीव घेतला आहे. जम्मूतल्या आर. एस. पुरामधील बड्याल काझीयन गावातल्या पबजी खेळणाऱ्या तिघांनी एका व्यक्तीची हत्या केली आहे. पबजी खेळताना आवाज कमी करा, असं संबंधित व्यक्तीनं तिघांना सांगितलं. त्याचा राग आल्यानं तिघांनी त्या व्यक्तीची हत्या केली. पीटीआयनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.राज कुमार, बिकराम जीत आणि रोहित कुमार पबजी खेळत होते. त्यावेळी त्यांना दलीप राज यांनी आवाज कमी करण्यास सांगितलं. त्यामुळे राज आणि तिघांमध्ये वाद झाला. आम्ही गेम खेळत असताना लक्ष विचलित का केलंस, अशी विचारणा तिघांनी राज यांच्याकडे केली. त्यांच्यातलं भांडण काही वेळानं निवळलं. मात्र याचा राग मनात धरून तिघांनी राज यांच्यावर त्याच दिवशी एका ओंडक्यानं हल्ला केला. त्यात राज अतिशय गंभीर जखमी झाले. त्यांचा जागीच मृत्यू झाला.पबजीची लोकप्रियता सातत्यानं वाढत आहे. हा गेम तरुणाईच्या पसंतीस उतरला आहे. मात्र अनेकांना पबजीचं व्यसन लागलं आहे. गेल्या महिन्यात पंजाबच्या जालंधरमध्ये एका तरुणानं पबजीमुळे स्वत:वर गोळी झाडून घेतली होती. सतत पबजी खेळत असल्यानं तरुणाच्या वडिलांनी त्याचा स्मार्टफोन काढून घेतला. त्यामुळे मुलगा नाराज झाला. त्यानं स्वत:वर गोळी झाडू आयुष्य संपवलं. पबजीच्या वेडामुळे स्वत:ला किंवा इतरांना इजा पोहोचवल्याच्या अशा अनेक घटना गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं समोर येत आहेत. 

टॅग्स :PUBG Gameपबजी गेम