शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

नालासोपारा स्फोटकांप्रकरणी लंकेश हत्याकांडातील काळेसह तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 06:05 IST

नालासोपारा स्फोटके प्रकरणात सहभाग समोर येताच, एटीएसने पत्रकार गौरी लंकेश हत्याकांडातील आरोपी अमोल काळेसह अमित बद्दी, गणेश मिस्कीन अशा तिघांचा ताबा घेत त्यांना अटक केली.

मुंबई : नालासोपारा स्फोटके प्रकरणात सहभाग समोर येताच, एटीएसने पत्रकार गौरी लंकेश हत्याकांडातील आरोपी अमोल काळेसह अमित बद्दी, गणेश मिस्कीन अशा तिघांचा ताबा घेत त्यांना अटक केली. विशेष न्यायालयाने शनिवारी तिघांना १२ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.नालासोपारा स्फोटकांप्रकरणी वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर, अविनाश पवार, वासुदेव सूर्यवंशी आणि लीलाधर उर्फ विजय उर्फ लंबू उखडूर्ली लोधीसह गौरी लंकेश हत्याकांडातील आरोपी सुजीत कुमार आणि भरत कुरणे यांना अटक करण्यात आली होती. या नवीन अटकेमुळे हा आकडा १२ वर पोहोचला आहे.शनिवारी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) तिघांना विशेष न्यायालयात हजर केले. हिंदुत्ववाद्यांकडून जप्त केलेल्या डायरींमुळे या तिघांचा सहभाग समोर आल्याचे एटीएसने न्यायालयात सांगितले. त्या डायरीही न्यायालयात सादर करण्यात आल्या. तसेच सूर्यवंशीने गुन्ह्यात कर्नाटकच्या धारवडमधून वाहने चोरी केली. या चोरीत या तिघांचाही सहभाग असल्याचे त्यांनी न्यायालयात सांगत, तिघांच्या कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्याची मागणी केली.आरोपींचे वकील संजीव पुनाळेकर यांनी याला विरोध केला. चोरी प्रकरणावेळी तिघेही न्यायालयीन कोठडीत होते. त्यामुळे त्यात त्यांचा सहभाग असणे शक्य नाही. शिवाय, त्यांचा काय सहभाग आहे, हे अद्याप सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे जास्तीच्या कोठडीची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर न्यायालयाने तिघांना ६ दिवसांची पोलीस कोठडी दिली. एटीएसने तिघांकडे कसून चौकशी सुरू केली आहे. चौकशीतून या प्रकरणात आणखी नवे चेहरे समोर येण्याची शक्यता एटीएसने वर्तविली आहे.विशेष सरकारी वकिलाची नियुक्तीएटीएसने या वेळी विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांची नियुक्ती केली आहे. मात्र, या नियुक्तीवर आरोपींचे वकील पुनाळेकर यांनी ताशेरे ओढले. शासन विनाकारण फक्त प्रकरण चालू ठेवण्यासाठी विशेष वकिलांवर पैसे खर्च करीत असल्याचा आरोप केला आहे.

टॅग्स :ArrestअटकMumbaiमुंबई