शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अखिल भारतीय सेनेच्या मावळ तालुकाध्यक्षासह तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 7:02 PM

आरोपींकडून दोन गावठी पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत.

पिंपरी : बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. कुख्यात गुंड अरुण गवळीच्या अखिल भारतीय सेनेच्या मावळ तालुकाध्यक्षाचा यात समावेश आहे. गुन्हे शाखा युनिट एकच्या वतीने मंगळवारी (दि. २१) ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून दोन गावठी पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चरण बाळासाहेब ठाकर (वय २६, रा. दारुंब्रे, ता. मावळ), प्रदीप शिवाजी खांडगे (वय २८, रा. पांगरी, ता. खेड, जि. पुणे) आणि राजू शिवलाल परदेशी (वय ५९, रा. दत्तवाडी, कुसगाव बुद्रुक, ता. मावळ) यांना अटक केली आहे.  पोलीस कर्मचारी गणेश सावंत माहिती मिळाली की, आळंदी येथे केळगाव रोडवर एक जण पिस्तूल विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार सापळा लावून चरण ठाकर याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. त्याच्याकडे चौकशी केली असता प्रदीप खांडगे याच्याकडून पिस्तूल विकत घेतल्याने त्याने सांगितले. शोध घेऊन प्रदीप खांडगे यालाही अटक करण्यात आली. मध्यप्रदेशातून दोन पिस्तूल आणल्याचे प्रदीप खांडगे याने चौकशीदरम्यान सांगितले. त्यातील एक पिस्तूर चरण ठाकर आणि एक पिस्तूल राजू परदेशी यांना विकल्याचे प्रदीप खांडगे याने सांगितले. त्यानुसार राजू परदेशी याला अटक करून त्याच्या घरातून एक पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. आरोपी चरण बाळासाहेब ठाकर याच्याविरोधात तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे तो पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तसेच कुख्यात गुंड अरुण गवळी याच्या अखिल भारतीय सेनेचा तो मावळ तालुकाध्यक्ष आहे. प्रदीप खांडगे याच्यावरही गुन्हा दाखल आहे. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक निरीक्षक गणेश पाटील, उपनिरीक्षक काळुराम लांडगे, सहायक फौजदार प्रमोद वेताळ, प्रमोद लांडे, मनोजकुमार कमले, सावन राठोड, अमित गायकवाड, सचिन उगले, प्रवीण पाटील, विशाल भोईर, गणेश सावंत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडArrestअटकPoliceपोलिस