शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गुडविन ज्वेलर्सविरुद्ध मुंबईत नव्याने तीन गुन्हे नोंद; पोलीस तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 06:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ठाणे, मुंबई, पुणे येथील हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या गुडविन ज्वेलर्स बंधूंविरुद्ध मुंबईत एल.टी. मार्ग ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ठाणे, मुंबई, पुणे येथील हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या गुडविन ज्वेलर्स बंधूंविरुद्ध मुंबईत एल.टी. मार्ग पोलीस ठाण्यात नव्याने ३ गुन्हे नोंद झाले. यात एकूण ७ कोटींची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.दादर येथील नीलेश सोहनलाल शोभावत (४८) यांनी केलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे झवेरी बाजारात ज्वेलर्सचे दुकान आहे. २०१५ मध्ये दागिन्यांच्या प्रदर्शनादरम्यान गुडविन ज्वेलर्सच्या सुधीरकुमार मोहनन अकाराकरण आणि सुनीलकुमार मोहनन अकाराकरण यांची भेट झाली. त्यांनी संपूर्ण भारतात दागिन्यांच्या विक्रीचा व्यवसाय होत असून, दागिने आवडल्याचे सांगून व्यवहार करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार २०१६ पासून व्यवहार सुरू झाला. सुरुवातीला पैसे मिळत असल्याने त्यांनी उधारीवर दागिने देण्यास सुरुवात केली. याचदरम्यान १० आॅक्टोबर २०१९ रोजी एक कोटी किमतीचे दागिने दिले. मात्र त्याचे पैसे दिले नाही. यातच, गुडविन ज्वेलर्सने वेगवेगळ्या ज्वेलर्सकडून घेतलेल्या मालाचे पैसे दिले नसल्याने त्यांच्या विरोधात पुणे येथे गुन्हा दाखल झाल्याचे समजताच त्यांना धक्का बसला. पैसे परत मिळण्याची शक्यता धूसर झाल्याने त्यांनी पोलीस ठाणे गाठून पत्र दिले आहे.परेलचे सराफ भरत ललित मेहता आणि चिंचपोकळीचे प्रवीण राठोड यांचीही अशाच प्रकारे फसवणूक झाली आहे. मेहता यांची २ कोटी ६५ लाख तर राठोड यांची ३ कोटी ३४ लाखांना फसवणूक झाली. दोघांचेही झवेरी बाजारात ज्वेलर्सचे दुकान आहे.अकाराकरण बंधू मुंबई, ठाणे, पुणे, केरळ येथील २२ शाखा बंद करून पसार झाले होते. मुंबई, ठाणे, पुण्यात गुन्हे नोंद झाल्यानंतर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यांना ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. आता त्यांच्यावर नव्याने गुन्हे नोंद झाले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.