शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

'मल्टी नॅशनल कंपनीत इंजिनिअर, करोडोंचा बंगला...' बॉयफ्रेंडसोबत ड्रग्ज विकताना तरुणीला अटक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 13:01 IST

पूजा गुप्ता असे आरोपी तरुणीचे नाव असून ती एका मल्टी नॅशनल कंपनीत काम करते.

उत्तर प्रदेशातील गौतम बुद्धनगर जिल्ह्यातील फेज थ्री पोलिसांनी एका सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीसह तिघांना अटक केली आहे. हे सर्वजण रेव्ह पार्टी, पब आणि बारमध्ये विदेशी ड्रग्जचा पुरवठा करत असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी तिघांकडून 289 एमडीएमए गोळ्या जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या गोळ्यांची अंदाजे किंमत 25 लाख रुपये आहे. तसेच, या तिघांच्या म्होरक्यासह तीन आरोपी फरार आहेत. पोलिसांचे पथक त्यांचा शोध घेत आहे.

दरम्यान, पूजा गुप्ता असे आरोपी तरुणीचे नाव असून ती एका मल्टी नॅशनल कंपनीत काम करते. यासोबतच तिचा बॉयफ्रेंड अभिषेक चौहान आणि पुलकित कपूर यांनाही अटक करण्यात आली आहे. नोएडा सेंट्रलचे डीसीपी राम बदन यांनी सांगितले की, तिन्ही आरोपी विदेशी सिंथेटिक ड्रग्स एमडीएमए गोळ्यांचा वापर आणि पुरवठा करत होते. आरोपींच्या सुचनेवरून पोलिसांनी सेक्टर-61 मध्ये असलेल्या पूजा गुप्ताच्या कोठीवर छापा टाकला. याठिकाणी तपासानंतर विदेशी ड्रग्ज रॅकेटचा खुलासा झाला.

या तिघांचा म्होरक्या सूर्यांश असून तो त्यांना ड्रग्जचा पुरवठा करत होता. सूर्यांशकडून पुलकित कपूर ड्रग्ज घेऊन पूजा आणि अभिषेकला देत होता. त्यानंतर ग्राहक पूजाच्या घरातून वैयक्तिक खरेदी करायचे आणि रेव्ह किंवा इतर पार्ट्यांमध्ये वापर करत होते. तसेच, ही टोळी ऑनलाइन लोकांना सिंथेटिक ड्रग्जचा पुरवठा करत होती. सूर्यांश इतका हुशार होता की, पोलिसांना संशय येऊ नये, यासाठी तो बीएमडब्ल्यू कारमधून कुरिअर पॅकेटमध्ये ड्रग्ज आणून नोएडाला पोहोचवत होता.

वडील रेल्वेत, आई डॉक्टर आणि स्वत: मल्टीनॅशनल कंपनीतडीसीपी राम बदन यांनी सांगितले की, पूजा गोरखपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिचे वडील रेल्वेत अभियंता आहेत, तर आई एमबीबीएस डॉक्टर आहे. पूजाने कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक केले आहे. बी.टेक पूर्ण केल्यानंतरच ती नोएडाला आली आणि नोकरी करू लागली. यानंतर नोएडामध्ये राहण्यासाठी तिच्या पालकांनी एक बंगला खरेदी केले. हा बंगला सेक्टर-61 सारख्या पॉश भागात होते. या बंगल्यात पूजाने अगदी नोकरांनाही घरी कामासाठी ठेवले होते. पूजा स्वतः एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करत होती. तिच्याकडे लाखांचे पॅकेज होते. 

टॅग्स :Drugsअमली पदार्थCrime Newsगुन्हेगारी