शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधमांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 21:06 IST

Gangrape : सामूहिक बलात्कार केला. कुठे वाच्यता केल्यास मारण्याची धमकी दिली .

ठळक मुद्देठाणे न्यायालयाने त्यांना ४ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

मीरारोड - भाईंदर पश्चिम भागात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला एका सदनिकेवर बोलावून तिच्यावर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी भाईंदर पोलिसांनी गुरुवार २५ फेब्रुवारी रोजी तीन आरोपींना अटक केली आहे . ठाणे न्यायालयाने त्यांना ४ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.याबाबत मिळालेल्या माहिती नुसार, चार दिवसांपूर्वी सदर पीडितेस तिच्या परिचयातील एकाने त्याच भागातील एका सदनिकेत रात्री १० च्या सुमारास बोलावले होते . मुलगी तेथे गेली असता त्याच्या सह अन्य दोघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. कुठे वाच्यता केल्यास मारण्याची धमकी दिली .सदर प्रकाराबाबत मुलीच्या निकटवर्तीयांना समजल्यावर त्यांनी भाईंदर पोलीस ठाण्यात धाव घेत घडला प्रकार सांगितला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत तिघाही आरोपीना बेड्या ठोकल्या. यातील एक आरोपी ५० वर्षीय तर दोघे २० ते २२ वयोगटातील आहेत. आरोपी व पीडिता हे एकाच परिसरात राहणारे व एकमेकांना ओळखत असल्याचे सांगण्यात आले. आरोपींबद्दल परिसरात संताप व्यक्त होत आहे. सहाय्यक आयुक्त शांतीलाल जाधव व भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शना खाली आरोपींना राहत्या घरातून अटक केल्यावर ठाणे न्यायालयात हजर केले असता त्यांना ४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. भाईंदर पोलीस पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Arrestअटकsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसbhayandarभाइंदरthaneठाणेCourtन्यायालय