शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

व्हिडीओ हटविण्यासाठी मोजले तीन लाख रुपये; अंधेरी पोलिसांत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 07:07 IST

तक्रारदार विजय (नावात बदल) हे अंधेरी पूर्वेतील कोंडी विटा गुंफा या ठिकाणी असलेल्या हॉटेलमध्ये कामाला आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : यूट्यूबवर अपलोड केलेले न्यूड व्हिडीओ हटवण्याच्या बहाण्याने एका हॉटेल कर्मचाऱ्याकडून जवळपास ३ लाख रुपये उकळण्यात आले. मात्र पैशांची मागणी वाढत गेली आणि या व्यक्तीने अखेर अंधेरी पोलिस ठाण्यांत याप्रकरणी तक्रार दाखल केली.

तक्रारदार विजय (नावात बदल) हे अंधेरी पूर्वेतील कोंडी विटा गुंफा या ठिकाणी असलेल्या हॉटेलमध्ये कामाला आहेत. त्यांना २३ फेब्रुवारी रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास अनोळखी मोबाइल नंबरवरून व्हाट्स ॲप व्हिडीओ कॉल आला. जो त्यांनी घेतल्यावर समोर एक तरुणी विवस्त्र अवस्थेत त्यांना दिसली. त्यामुळे कॉल सुरू ठेवत आणि तिचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला मात्र, तो त्यांना पाहता आला नाही आणि अखेर त्यांनी तो कॉल कट केला. त्यानंतर समोरच्या क्रमांकावरून तीनवेळा व्हाट्सॲप व्हिडीओ कॉल आले. दुसऱ्या दिवशी दुपारी अडीचच्या सुमारास त्यांना एका मोबाइल क्रमांकावरून कॉल आला आणि कॉलरने विजयला त्यांचे न्यूड व्हिडीओ अनोळखी व्यक्तीने यूूट्यूबवर टाकले असून ते डिलिट करायचे असल्यास विशिष्ट क्रमांकावर कॉल करण्यास सांगितले. 

असे उकळले पैसे दिलेला नंबर विजयने डायल केल्यावर त्यांना एका मोबाइल क्रमांकावर ३१ हजार ५०० रुपये पाठविण्यास सांगितले. जे पाठविल्यावर अजून ६२ हजार ५०० रुपये अन्य दोन व्हिडीओ डिलिट करण्यासाठी मागितले. विजयने त्याच्या मित्राकडून ते पैसे पाठवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे थोडे थोडे करत कॉलरने तक्रारदाराकडून ३ लाख ६ हजार रुपये उकळले तरी पैसे मागणे थांबत नव्हते. अखेर तक्रारदाराने याप्रकरणी अंधेरी पोलिसात धाव घेत अनोळखी व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी